पुसेसावळी येथील दोन दुकानांवर गुटखा विक्रीप्रकरणी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:24 AM2021-07-05T04:24:25+5:302021-07-05T04:24:25+5:30
पुसेसावळी : खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथील दोन दुकानांवर गुटखा विक्रीप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात ...
पुसेसावळी : खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथील दोन दुकानांवर गुटखा विक्रीप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, पुसेसावळी येथील राऊत ट्रेडिंग कंपनी व अभिनव ट्रेडिंग कंपनी येथे शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास छापा टाकून मुद्देमालासह दोघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये ओंकार सुरेश राऊत (वय २६, रा. पुसेसावळी) याच्याकडे विमल २६ हजार ७६० रुपये किमतीचा गुटखा तसेच पंकज सुभाष खोत (२३, रा. पुसेसावळी) याच्याकडे १२ हजार रुपयांचा असा एकूण ३८ हजार ७६० रुपयांचा गुटखा साठा जप्त करण्यात आला आहे. याबाबतचा गुन्हा औंध पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार दिनकर काळे अधिक तपास करत आहेत.