वसुलीत हयगय केल्यास अधिकारी, कर्मचाºयांवर कारवाई : संजय ताकसांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 01:30 PM2017-08-12T13:30:05+5:302017-08-12T13:32:23+5:30

सातारा : वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा करण्यासाठी उच्च व लघुदाब वीजग्राहकांविरोधात आक्रमक होत महावितरणने पुणे, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहिम सुरु केली आहे.  थकीत वीजबिलांच्या वसुलीमध्ये हयगय किंवा हेतुपुरस्सर दुर्लक्ष करणाºया स्थानिक अधिकारी व कर्मचारी यांच्यासह त्यांच्या वरिष्ठ अधिकाºयांविरुद्ध  कारवाई करण्याचा इशारा प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी दिला आहे.

Action taken on officers, employees, after sanctioning recovery: Sanjay Takasande | वसुलीत हयगय केल्यास अधिकारी, कर्मचाºयांवर कारवाई : संजय ताकसांडे

वसुलीत हयगय केल्यास अधिकारी, कर्मचाºयांवर कारवाई : संजय ताकसांडे

Next
ठळक मुद्देथकबाकी न भरल्यास ग्राहकांचा वीजपुरवठा खंडितवीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहिम वीजबिलांच्या थकबाकीसाठी ग्राहकांविरोधात महावितरण आक्रमकवीजबील भरणा केंद्र सुरु


सातारा : वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा करण्यासाठी उच्च व लघुदाब वीजग्राहकांविरोधात आक्रमक होत महावितरणने पुणे, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहिम सुरु केली आहे. 

थकीत वीजबिलांच्या वसुलीमध्ये हयगय किंवा हेतुपुरस्सर दुर्लक्ष करणाºया स्थानिक अधिकारी व कर्मचारी यांच्यासह त्यांच्या वरिष्ठ अधिकाºयांविरुद्ध  कारवाई करण्याचा इशारा प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी दिला आहे.


 याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘पश्चिम महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांत वीजग्राहकांच्या दरमहा वीजबिलांसह थकीत रकमेची वसुली कमी झालेली आहे. ही स्थिती अत्यंत खेदजनक आहे. थकबाकी वसुलीशिवाय अन्य कोणताही पर्याय राहिलेला नाही, याची महावितरणचे अधिकारी व कर्मचाºयांनी गांभिर्याने नोंद घ्यावी.


तात्पुरता किंवा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार अनधिकृतपणे विजेचा वापर करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई तसेच वीजग्राहकांकडे किती रक्कम थकीत आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. थकबाकीदारांनी वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी थकीत वीजबिलांचा त्वरीत भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

वीजबील भरणा केंद्र सुरु


पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबील भरणा केंद्र वीजग्राहकांच्या सोयीसाठी शनिवारी (दि. १२) व रविवारी (ता. १३) सुरु राहणार आहेत. या दोन्ही दिवशी सार्वजनिक सुटी आहे. सद्यस्थितीत थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहिम सुरु आहे. वीजग्राहकांना वीजबिलाचा व थकबाकीचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी महावितरणचे अधिकृत वीजबील भरणा केंद्र्र त्यांच्या कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहेत.

Web Title: Action taken on officers, employees, after sanctioning recovery: Sanjay Takasande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.