सांबरवाडी फाटा येथे तालुका पोलिसांकडून कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:26 AM2021-06-28T04:26:32+5:302021-06-28T04:26:32+5:30
पेट्री : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार, रविवारी निर्बंध कडक केलेल्या असल्यामुळे कास परिसरात विनाकारण फिरणाऱ्या व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दोन ...
पेट्री : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार, रविवारी निर्बंध कडक केलेल्या असल्यामुळे कास परिसरात विनाकारण फिरणाऱ्या व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दोन दिवस सांबरवाडी फाटा येथे तालुका पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली.
शनिवार, रविवार असतानाही बहुसंख्य पर्यटक रविवारी सकाळपासून कासच्या दिशेने जात दिसत होते. दिवसभर तालुका पोलिसांनी नाकाबंदी करून परिसरात गर्दी होऊ नये तसेच नियम पाळले जावेत यासाठी बहुतांशी पर्यटकांच्या गाड्या यवतेश्वर घाटातून माघारी पाठवल्या. सोशल डिस्टन्सिंग न पाळणारे, मास्क न लावणारे तसेच विनाकारण फिरणारे वाहनचालक व मोटार वाहन कायदा कलमान्वये नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
शनिवारी विनामास्क सात जणांवर कारवाई करून साडेतीन हजार रूपये व विनाकारण फिरणारे, मोटार वाहन कायदा कलमान्वये तीस जणांवर कारवाई करून सात हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच रविवारी विनामास्क दहा जणांवर कारवाई करून पाच हजार रुपये व विनाकारण फिरणारे, मोटार वाहन कायदा कलमान्वये चाळीस जणांवर कारवाई करून दहा हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सुहास पवार, रमेश शिखरे यांनी केली.