दूध दर न देणाºया संस्थांवर कारवाई--महादेव जानकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 07:24 PM2017-10-07T19:24:23+5:302017-10-07T19:27:56+5:30
फलटण : ‘दूध खरेदी दरात वाढ करून प्रती लिटर २७ रुपये देणे बंधनकारक केले असून,
लोकमत न्यूज नेटवर्क
फलटण : ‘दूध खरेदी दरात वाढ करून प्रती लिटर २७ रुपये देणे बंधनकारक केले असून, ज्या खासगी व सहकारी संस्था या निर्णयाची अंमलबजावणी करणार नाहीत,त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे,’ असे राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेवराव जानकर यांनी स्पष्ट केले आहे. येथील शासकीय विश्रामधाम येथे पत्रकारांशी मंत्री जानकर बोलत होते.
मंत्री जानकर म्हणाले, ‘या प्रश्नात आपण पूर्णपणे लक्ष देत असून, आतापर्यंत राज्यातील काही संस्थांवर कारवाई करण्यात आली असून, या निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे, यावर आपण ठाम असून, शेजारच्या राज्यात दिले जात असलेले दूध खरेदी अनुदानाचा प्रत्यक्ष लाभ दूध उत्पादकांना मिळत नसल्याने त्याला आपला विरोध आहे.’
शासनाने दूध खरेदी दर प्रती लिटर २७ रुपये देण्याचे बंधन घातले आहे. मात्र, संकलित होणारे संपूर्ण दूध ग्राहकांना किरकोळीने विकले जात नसल्याने त्यावर प्रक्रिया पावडर तयार करणे आज परवडणारे नसल्याने शासनाने हे दूध खरेदी केले पाहिजे, अशी अपेक्षा आहे. प्रत्यक्षात शासनाचे बहुतेक प्लँट बंद असल्याने २७ रुपये दराची अंमलबजावणी करण्यात अडचणी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन यावेळी महादेव जानकर यांनी दिले.
महानंद बाबतही आपल्याला योग्य निर्णय घ्यावा लागणार असून, त्याबाबतही लवकरच योग्य निर्णय घेणार असल्याचे तसेच साखर उद्योगाप्रमाणे दुग्ध व्यवसायाबाबत लवकरच निर्णय घेण्याप्रसंगी कायद्यात बदल करण्याचा विचार यावेळी जानकर यांनी व्यक्त केला.