ग्रामपंचायत निवडणुकीत कार्यकर्त्यांनी योगदान द्यावे : बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:41 AM2021-01-13T05:41:38+5:302021-01-13T05:41:38+5:30

सातारा : ‘जिल्ह्यात ग्रामपंचायतीची निवडणूक सुरू आहे. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जात पक्षासाठी योगदान द्यावे. तसेच या निवडणुकीच्या ...

Activists should contribute in Gram Panchayat elections: Bapat | ग्रामपंचायत निवडणुकीत कार्यकर्त्यांनी योगदान द्यावे : बापट

ग्रामपंचायत निवडणुकीत कार्यकर्त्यांनी योगदान द्यावे : बापट

Next

सातारा : ‘जिल्ह्यात ग्रामपंचायतीची निवडणूक सुरू आहे. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जात पक्षासाठी योगदान द्यावे. तसेच या निवडणुकीच्या माध्यमातून पक्षाचे संघटन आणखी मजबूत करावे,’ असे आवाहन खासदार गिरीश बापट यांनी रविवारी केले.

सातारा येथे शासकीय विश्रामगृहावर भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खासदार बापट बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, दत्ताजी थोरात, सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, शहराध्यक्ष विकास गोसावी, नगरसेवक विजय काटवटे, धनंजय कांबळे, मिलिंद काकडे, किशोर गोडबोले, जयदीप ठुसे, विक्रांत भोसले, आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. खासदार गिरीश बापट यांनी सातारा, जावळी आणि कोरेगाव तालुक्यांतील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा आढावा घेतला. तसेच जिल्ह्यात पक्षवाढ, संघटन मजबूत करण्यासाठी काय करता येईल यावर विचारमंथन करण्यात आले. त्याचबरोबर खासदार बापट यांनी जिल्ह्यात भाजपचे संघटन चांगले असले तरी ते आणखी मजबूत व्हावे. नगरसेवकांनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ग्रामीण भागात जाऊन पक्षाचा प्रचार करावा, अशी सूचनाच केली.

या बैठकीनंतर खासदार गिरीश बापट हे वाईकडे रवाना झाले. दिवसभरात त्यांनी अन्य काही ठिकाणीही बैठका घेतल्या.

फोटो ओळ : सातारा येथील शासकीय विश्रामगृहात खासदार गिरीश बापट यांनी भाजप पदाधिकाऱ्यांकडून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने माहिती घेतली. तसेच उपस्थितांना मार्गदर्शनही केले.

.......................................................

Web Title: Activists should contribute in Gram Panchayat elections: Bapat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.