अभिनेत्रीचं प्रेम एसटीत बहरलं...चंदगडमध्ये स्थिरावलं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:35 AM2021-01-22T04:35:56+5:302021-01-22T04:35:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा: अभिनेत्री पासष्ट तर तो अवघ्या तेहत्तीस वर्षांचा. एसटीतून प्रवास करताना अभिनेत्रीचं त्याच्यावर एकतर्फी प्रेम जडलं. ...

Actress's love blossomed in ST ... settled in Chandgad! | अभिनेत्रीचं प्रेम एसटीत बहरलं...चंदगडमध्ये स्थिरावलं!

अभिनेत्रीचं प्रेम एसटीत बहरलं...चंदगडमध्ये स्थिरावलं!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा: अभिनेत्री पासष्ट तर तो अवघ्या तेहत्तीस वर्षांचा. एसटीतून प्रवास करताना अभिनेत्रीचं त्याच्यावर एकतर्फी प्रेम जडलं. साताऱ्यापासून सुरू झालेल्या दोघांमधील गप्पा चंदगडपर्यंत रंगल्या. तर एसटीतून उतरताना अभिनेत्रीनं त्याला चित्रीकरण पाहण्यासाठीही बोलावलं अन् तिचं एकतर्फी प्रेम चंदगडमध्ये स्थिरावलं. ही एखाद्या चित्रपटाला शोभेल, अशी कहाणी ऐकून तपासी अधिकारीही थक्क झाले. ही घटना आहे. साताऱ्यात खून झालेल्या अभिनेत्री जया पाटील यांची.

अभिनेत्री जया पाटील यांचा साताऱ्यातील कृष्णानगरमध्ये बंगला आहे. या बंगल्यामध्ये त्या एकट्याच वास्तव्यास होत्या. अनेक वर्षांपासून त्या मालिका आणि वेबसिरीजमध्ये काम करत होत्या. खरं त्या मुंबई येथे वास्तव्यास होत्या. परंतु लॉकडाऊनमुळे त्या गावी आल्या. इथूनच त्या शूटिंगसाठी जात असत. दीड महिन्यांपूर्वी एका मालिकेचे शूटिंग कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील एका गावात होते. या शूटिंगसाठी त्या सातारा बसस्थानकातून एसटीने निघाल्या. त्याचवेळी साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये काम करणारा आनंत पेडणेकर (वय ३३) हा त्याच्या गावी चंदगड (मावेली) येथे निघाला होता. दोघेही एकाच सीटवर बसले होते. गप्पांमधून एकमेकांची ओळख झाली. जया पाटील यांनी आपण अभिनेत्री असून, शूटिंगसाठी चंदगडला जात असल्याचे सांगितले. चंदगडपर्यंत दोघेही गप्पांमध्ये रममाण झाले. चंदगडमध्ये एसटी पोहोचल्यानंतर दोघांच्या फोननंबरची देवाणघेवाणही झाली. त्यानंतर अभिनेत्री जया पाटील यांनी आनंतला शूटिंग पाहण्यासाठीही बोलावले. आनंतही उत्सुकतेपोटी शूटिंग पाहण्यासाठी गेला. पण जया पाटील यांच्या मनात आनंतविषयी वेगळेच चालले होते. चंदगडमध्ये काही दिवस पाटील या वास्तव्याला होत्या. त्यामुळे दोघांमध्ये अधिकच चांगली ओळख झाली. इथेच पाटील याचं एकतर्फी प्रेम स्थिरावलं.

शूटिंग संपल्यानंतर जया पाटील या साताऱ्याला आल्या. त्यानंतर त्यांनी एके दिवशी आनंतला चहा पिण्यासाठी घरी बोलावलं. तत्पूर्वी त्यांनी चहामध्ये उत्तेजित होणाऱ्या गोळ्या टाकल्या. चहा पिल्यानंतर आनंतला भोवळ आली. अतिप्रमाणात गोळ्यांचा डोस झाल्यामुळे आनंतला काहीवेळ सुचेनासे झाले. अशा अवस्थेत पाटील यांनी त्याच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो साताऱ्यातील संभाजीनगर येथे राहात असलेल्या खोलीवर गेला. आठ-दहा दिवसानंतर पुन्हा त्याला गावचे तांदूळ आणण्यास सांगितले. आनंतने गावाला जाऊन तांदूळ आणले. ते तांदूळ देण्यासाठी तो त्या दिवशी जया पाटील यांच्या घरी आला. पुन्हा असाच प्रकार घडला. पाटील यांनी चाकू हातात घेतला. मी सांगेल तसे केले नाहीस तर मी आता ओरडेन आणि पोलिसांनाही सांगेन, अशी त्याला धमकी देत त्याच्यावर जबरदस्ती करू लागल्या. संतापलेल्या आनंतने तोच चाकू हातातून हिसकावून घेऊन पाटील यांच्या गळ्यावरून फिरवला आणि त्या रक्ताच्या थोराळ्यात पडल्यानंतर तोच चाकू स्वच्छ धुऊन तेथून निघून गेला.

चौकट : बोटाचा घेतला लचका

चहामध्ये उत्तेजक गोळ्या मिसळल्यामुळे आनंतला भोवळ येत होती. अशा अवस्थेत त्या जबरदस्ती करत होत्या. तोंडात बोट घेऊन त्यांनी हाताच्या बोटाचा लचकाही काढला. पोलिसांनी ज्यावेळी आनंतला चौकशीसाठी बोलावलं. तेव्हा आनंतच्या बोटाच्या जखमेमुळेच या खूनप्रकरणाचा एक एक किस्सा समोर आला. यानंतर आनंतने दीड महिन्याच्या एकतर्फी प्रेमाची कहाणी पोलिसांसमोर कथन केली.

आनंत हा साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये कॅप्टन म्हणून काम करत होता. तो विवाहित असून, त्याला चार महिन्यांपूर्वीच मुलगा झाला आहे.

Web Title: Actress's love blossomed in ST ... settled in Chandgad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.