आदर्की फाटा-फलटण रस्त्याची साफसफाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:33 AM2021-01-17T04:33:30+5:302021-01-17T04:33:30+5:30
आदर्की : फलटण-सातारा रस्त्यावर आदर्की फाटा ते घाडगेवाडी दरम्यानच्या रस्त्याच्या साईडपट्ट्यांवर गवत व झुडपे मोठ्या प्रमाणात उगवल्याने साईडपट्ट्या ...
आदर्की : फलटण-सातारा रस्त्यावर आदर्की फाटा ते घाडगेवाडी दरम्यानच्या रस्त्याच्या साईडपट्ट्यांवर गवत व झुडपे मोठ्या प्रमाणात उगवल्याने साईडपट्ट्या गायब झाल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. यासंबंधी ‘लोकमत’मधून बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर साईटपट्ट्यांवरील काटेरी झुडपे व गवत काढल्यामुळे वाहनधारकांतून समाधान व्यक्त होत आहे.
फलटण-सातारा रस्त्यावर आदर्की फाटा ते आदर्की खुर्दपर्यंत एका ठेकेदाराने डांबरीकरण केले; परंतु साईडपट्ट्यावर मुरूम भरला नव्हता. त्यामुळे गवत व मोठमोठी झुडपे उगवली आहेत. त्यामुळे पट्टीवरील नंबर व किलोमीटरचे दगड दिसत नाहीत. या मोठ्या गवतामुळे पुलाचे कठडे तुटले आहेत. त्याठिकाणी दुचाकी-चारचाकी जाऊन अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच ठेकेदाराने फलटण पुलावर डांबरीकरण केले नाही. आदर्की बुद्रुक ते आदर्की खुर्दच्या दरम्यान पावसात डांबर टाकल्याने उचकटलेले आहे, तर रस्त्याच्या डाव्या बाजूला टेलिफोनसाठी काढण्यात आलेली चर अद्याप मुजवली नव्हती. ती चर रस्त्याच्या साईडपट्टीवर काढली आहे. त्या पट्टीवर गवत उगवल्याने चर दिसत नव्हती. तरी संबंधित विभागाने आदर्की फाटा, आदर्की खुर्द व कापशी ते घाडगेवाडीपर्यंत साईडपट्टीवर वाढलेले गवत काढून साईडपट्टीवर रोलिंग करून वाहतुकीसाठी रस्ता चांगला करण्याची मागणी प्रवाशांमधून होत होती. याचा पाठपुरावा केल्यानंतर संबंधित विभागाने साईडपट्ट्यांची साफसफाई केली.
१६आदर्की
फोटो : आदर्की फाटा-फलटण रस्त्यावर साईडपट्ट्यांच्या साफसफाईचे काम सुरू आहे. (छाया : सूर्यकांत निंबाळकर)