उमरकांचनच्या पुनर्वसनासाठी तडसर गावचा आराखड्यात समावेश करा

By admin | Published: April 24, 2017 10:02 PM2017-04-24T22:02:44+5:302017-04-24T22:02:44+5:30

विजय शिवतारे; जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सूचना

Add to the Tadasar village plan for the rehabilitation of Urkanchan | उमरकांचनच्या पुनर्वसनासाठी तडसर गावचा आराखड्यात समावेश करा

उमरकांचनच्या पुनर्वसनासाठी तडसर गावचा आराखड्यात समावेश करा

Next

सातारा : ‘वांग-मराठवाडी धरणग्रस्त मौजे उमरकांचन गावच्या पुनर्वसनासाठी सांगली जिल्ह्यातील तडसर गाव आराखड्यात समावेश करावे,’ अशा सूचना पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिल्या.
कृष्णा खोरे महामंडळाच्या प्रलंबित पुनर्वसन प्रश्नांबाबत पालकमंत्री शिवतारे यांनी सोमवारी येथील नियोजन भवनात बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला आमदार शंभूराज देसाई, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, सांगलीचे अप्पर जिल्हाधिकारी संजय चव्हाण, पुनर्वसन अधिकारी आरती भोसले, तुषार ठोंबरे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता विजय घोगरे स प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.
सुरुवातीला आमदार देसाई यांनी सर्वांचे स्वागत करून प्रलंबित प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सविस्तरपणे सांगितले. यावर पालकमंत्री शिवतारे म्हणाले, ‘वांग-मराठवाडी धरणासाठी मौजे उमरकांचनमधील ६२ जणांच्या पुनर्वसनासाठी सांगली जिल्ह्यातील तडसर गावात जमीन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. शासनाच्या नव्या धोरणानुसार अशा जागा पुनर्वसनासाठी प्राधान्याने शेतकऱ्यांना देण्यात याव्यात. त्यासाठी पुनर्वसन आराखड्यात तडसर गावचा समावेश करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
या गावाचा समावेश झाल्यास सांगली अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडून हा प्रस्ताव शासनाला जाईल आणि मौजे उमरकांचन गावचा पुनर्वसनाचा प्रश्न शासन दरबारी निकालात काढू.
महात्मेवाडी गावातील ४६ कुटुंबांची घरे पाण्याच्या कडेला आहेत. याबाबत जलसंपदा विभागाने पाण्याची रेषा अंतिम करावी. त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांकडून शपथ पत्र घेऊन भूखंडांचे वाटप करावे. मौजे कुशी गावातील लोकांना नागरी सुविधा पुरविल्या जातील,’ असे आश्वासनही त्यांनी दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Add to the Tadasar village plan for the rehabilitation of Urkanchan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.