आरोग्य केंद्र परिसरात लागणार व्यसनमुक्तीचे फलक

By admin | Published: November 2, 2014 12:36 AM2014-11-02T00:36:42+5:302014-11-02T00:36:42+5:30

आरोग्य सहसंचालकांच्या जिल्हा आरोग्य अधिका सूचना

Addiction panels in the health center area | आरोग्य केंद्र परिसरात लागणार व्यसनमुक्तीचे फलक

आरोग्य केंद्र परिसरात लागणार व्यसनमुक्तीचे फलक

Next

सातारा : केंद्र शासनाच्या सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादनांवरील बंदीच्या कडक अंमलबजावणी व सेवनावर प्रतिबंद बसावा, यासाठी जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांच्या परिसरात व्यसनमुक्तीपर जनजागृती फलक लावण्यात येण्यात आहेत. आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाला दिल्या आहेत.
सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे, थुंकण्यास मुंबई पोलीस कायद्यानुसार प्रतिबंध आहे. केंद्र शासनाच्या सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादनांच्या विक्रीवर बंदी आहे. मात्र, अनेक ठिकाणी चोरट्या मार्गाने स्वादिष्ट, सुगंधी तंबाखू, सुपारीची विक्री होत आहे. त्यामुळे ही बंदी केवळ कागदावरच असल्याचे निष्पन्न होत आहे.
तंबाखूजन्य पदार्थ्यांची वाहतूक करताना अधूनमधून पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. धुम्रपान करणे शरीराला घातक आहे. धुम्रपान करून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने सार्वजनिक इमारती विद्रूप होतात. थुंकीद्वारे क्षयरोग, स्वाइन फ्लू, न्यूमोनिया यासारख्या आजारांचा फैलाव होतो.
समाजात व्यसनमुक्तीसंदर्भात जनजागृती घडावी, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाची सर्व कार्यालये, आरोग्य उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालये, क्षयरोग व कुष्ठरोग रुग्णालये, संदर्भ सेवा रुग्णालये, पालिका हद्दीतील रुग्णालय परिसरात धुम्रपान करणे व थुंकण्यास मनाई असल्याचे फलक लावण्यात येणार आहेत. यासंदर्भात सचित्र माहिती, पोस्टर्स लावण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Addiction panels in the health center area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.