नवीन जालन्यात १५ जोडण्या केल्या बंद
By Admin | Published: March 27, 2015 12:29 AM2015-03-27T00:29:12+5:302015-03-27T00:29:12+5:30
जालना : ७५ टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात पाणीपट्टीची थकबाकी असलेल्या शहरातील विविध भागांमध्ये नळजोडण्या बंद करण्याची मोहीम नगरपालिकेने सुरू केली असून
मलकापूर : उसाच्या ट्रॉलीला धडक दिल्यानंतर ट्रक उपमार्गावरून खाली जाऊन दुकानात घुसला. मलकापूर येथे भरवस्तीत गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातात एकजण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, ट्रकच्या धडकेनंतर उसाच्या ट्रॉली सातारा-कोल्हापूर लेनवर पलटी झाली. परिणामी या मार्गावरील वाहतूक रात्री उशिरापर्यंत ठप्प होती. पलटी झालेली ट्रॉली व महामार्गावर विखुरलेला ऊस हटविण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू होते.
अपघातस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरच्या दिशेने उसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर गुरुवारी सायंकाळी मलकापूर येथे संगम हॉटेलसमोरील उड्डाण पुलावर आला. त्यावेळी पाठीमागून आलेल्या मालवाहतूक ट्रकने (एमएच १२ एचडी ३७०५) उसाच्या ट्रॉलीला जोरदार धडक दिली. त्यामुळे ट्रॉली महामार्गावरच पलटी झाली. त्यानंतर चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रक महामार्गावरून उपमार्गावर जाऊन नजीकच्या श्रीराम आॅटोमोबाईल्स दुकानामध्ये घुसला. दुकानासमोर उभ्या असलेल्या एका कारलाही ट्रकने धडक दिली. (प्रतिनिधी)