दीडशे शिक्षक ठरणार अतिरिक्त

By admin | Published: October 7, 2014 10:38 PM2014-10-07T22:38:25+5:302014-10-07T23:49:33+5:30

सेवकसंच निश्चिती : डीएड वेतनश्रेणीतील शिक्षकांवर अन्याय

Additional education will be 150 teachers | दीडशे शिक्षक ठरणार अतिरिक्त

दीडशे शिक्षक ठरणार अतिरिक्त

Next

सातारा : सेवक संच निश्चितीनुसार जिल्ह्यातील दीडशे ते दोनशे शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्यामुळे खासगी मात्र मान्यताप्राप्त असलेल्या शाळांमधील डीएड शिक्षकांवर अन्याय होणार आहे. दरम्यान, या अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन न केल्यास तीव्र लढा उभारण्याचा इशारा खासगी शाळांमधील डीएड शिक्षक संघटना आणि शिक्षकांनी दिला आहे.
याबाबत जिल्हा परिषदेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, या प्रक्रियेत काही ठिकाणी इ. ९ वी व १० वीच्या वर्गाला शिकविणारे शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. वास्तविक, सेवा ज्येष्ठतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करणे आवश्यक असताना माध्यमिक शिक्षण विभाग इ. ६ वी ते ८ वीपर्यंत डी. एड. वेतन श्रेणीतील शिक्षकांना अतिरिक्त ठरविले व त्यांच्या जागी बीएड वेतन श्रेणीतील शिक्षकांचे समायोजन करण्याचे काम सुरू आहे. बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिनियम २००९ नुसार इ. ६ वी ते ८ वी शिकविणारे शिक्षकांची शैक्षणिक पात्रता, मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि प्राथमिक शिक्षणशास्त्र दोन वर्षांची पदविका प्रमाणपत्र अशी आहे. त्यामुळे डी. एड. वेतन श्रेणीतील शिक्षक इ. ६ वी ते ८ वीला शिकविण्यास पात्र आहेत. तरीही बीएड वेतनश्रेणीतील अतिरिक्त पदांचे समायोजन करताना जाणीवपूर्वक डीएड वेतन श्रेणीतील शिक्षकांवर अन्याय केला जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Additional education will be 150 teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.