आदिती स्वामी हिच्या सुवर्णवेधने साताऱ्याचा लौकिक उंचावला, उदयनराजेंकडून विशेष कौतुक

By सचिन काकडे | Published: October 12, 2023 06:01 PM2023-10-12T18:01:08+5:302023-10-12T18:02:22+5:30

सातारा : साताऱ्याची राष्ट्रीय पातळीवरील अव्वल तिरंदाज आदिती स्वामी हिने चीनमध्ये झालेल्या आशियायी स्पर्धेतील तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. तिच्या ...

Aditi Swamy gold medal raised the reputation of Satara, special appreciation from Udayanraj bhosle | आदिती स्वामी हिच्या सुवर्णवेधने साताऱ्याचा लौकिक उंचावला, उदयनराजेंकडून विशेष कौतुक

आदिती स्वामी हिच्या सुवर्णवेधने साताऱ्याचा लौकिक उंचावला, उदयनराजेंकडून विशेष कौतुक

सातारा : साताऱ्याची राष्ट्रीय पातळीवरील अव्वल तिरंदाज आदिती स्वामी हिने चीनमध्ये झालेल्या आशियायी स्पर्धेतील तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. तिच्या या सुवर्णवेधमुळे साताऱ्याचा नावलौकिक जागतिक पातळीवर पोहोचला आहे. अशा गुणवंत खेळाडूंना दर्जेदार क्रीडा सुविधा पुरविल्यास त्यांच्याकडून सातत्यपूर्ण कामगिरी होत राहील, असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.

माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांच्या पुढाकाराने आदिती स्वामी हिचा जलमंदिर येथे खा. उदयनराजे भोसले व दमयंतीराजे भोसले यांच्या हस्ते गुरुवारी विशेष सत्कार करण्यात आला. आदितीच्या या सुवर्ण कामगिरीमुळे उदयनराजे यांनी तिचे विशेष कौतुक केले.

उदयनराजे म्हणाले, क्रीडा क्षेत्रामध्ये प्रचंड स्पर्धा आहे. मात्र आदितीने अत्यंत जिद्द आणि एकाग्रतेच्या बळावर तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली, हे कौतुकास्पद आहे. साताऱ्याच्या मातीत प्रचंड गुणवत्ता आहे. जिल्हा पातळीवर खेळाडूंना उत्तम सुविधा मिळाल्यास ते जागतिक दर्जाची कामगिरी नोंदवू शकतात. सुहास राजेशिर्के यांनी सुद्धा आदितीच्या कामगिरीचे कौतुक केले . आर्चरी खेळात अव्वल कामगिरी करणारी आदिती ही गुणवान खेळाडू आहे. सातत्यपूर्ण सराव व अव्वल कामगिरीसाठी साताऱ्यात क्रीडा सुविधा कशा उपलब्ध होतील, यासाठी क्रीडा विभागाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला जाईल.

कार्यक्रमासाठी संस्कार भारती सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष दिलीप चरेगावकर, विश्वनाथ भाकरे, रवींद्र माने, विजय चौगुले, रवींद्र भोकरे आदी उपस्थित होते.

Web Title: Aditi Swamy gold medal raised the reputation of Satara, special appreciation from Udayanraj bhosle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.