आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा येत्या मंगळवारी पाटणमध्ये!, शंभूराज देसाईंवर तोफ डागणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 07:23 PM2022-07-30T19:23:21+5:302022-07-30T19:44:09+5:30

बंडखोर आमदारांच्या मतदार संघात जावून कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम

Aditya Thackeray Nishtha Yatra in Patan, Shambhuraj Desai constituency on Tuesday | आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा येत्या मंगळवारी पाटणमध्ये!, शंभूराज देसाईंवर तोफ डागणार?

आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा येत्या मंगळवारी पाटणमध्ये!, शंभूराज देसाईंवर तोफ डागणार?

Next

प्रमोद सुकरे

कराड : एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षात फूट पडली. यानंतर आता युवानेते आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र पिंजून काढायला सुरूवात केली आहे. निष्ठा यात्रेच्या माध्यमातून बंडखोर आमदारांच्या मतदार संघात जावून कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम ते करीत आहेत. येत्या मंगळवारी दि. २ ऑगस्टला आदित्य ठाकरे माजी गृहराज्यमंत्री व बंडखोर आमदार शंभूराज देसाई यांच्या पाटण मतदार संघात येणार आहेत. यावेळी ते काय तोफ डागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० शिवसेना आमदारांनी बंडखोरी केली. यामध्ये सातारा जिल्ह्यातील  दोन आमदार असल्याने ते दौर्यावर येत आहेत. आमदार शंभूराज देसाई हे पाटण मतदार संघातून तर आमदार महेश शिंदे हे कोरेगाव मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात.  त्यामुळे आदित्य ठाकरे या दोघांवर काय तोफ डागणार हे पहावे लागेल.

निष्ठा यात्रेचा दुसरा टप्पा  १ व २ ऑगस्टला सिंधुदुर्ग, कोल्हापुर, पाटण, सातारा, पुणे असा असणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई, ठाणे, औरंगाबाद, पैठण, शिर्डी अशी यात्रा केल्यानंतर आदित्य ठाकरे एक ऑगस्टला सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि पुण्यात यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याकरीता दौऱ्यावर जाणार आहेत अशी माहिती मिळते. मंगळवारी दुपारी २ वाजता पाटण येथे निष्ठा यात्रा येणार आहे. तेथून ते पुढे पुण्याकडे रवाना होणार आहेत.

निसरे फाटा येथे होणार स्वागत

पाटण मतदार संघात आमदार  शंभूराज देसाई यांच्या बालेकिल्यात आदित्य ठाकरे येणार आहेत. निसरे फाटा येथे निष्ठा यात्रेचे स्वागत करण्यात येणार असून तेथून मल्हारपेठ पर्यंत रॅली काढण्यात येणार आहे. तेथे आमचे नेते आदित्य ठाकरे निष्ठा यात्रेच्या माध्यमातून शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. तेथून ते उंब्रज मार्गे पुण्याकडे रवाना होतील . - हर्षद कदम, जिल्हाप्रमुख

Web Title: Aditya Thackeray Nishtha Yatra in Patan, Shambhuraj Desai constituency on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.