प्रशासन तळ्यात-मळ्यात!

By admin | Published: September 2, 2015 09:47 PM2015-09-02T21:47:03+5:302015-09-02T23:26:23+5:30

गणेशमूर्ती विसर्जन : पालिकेने आधीच केल्यात पर्यायी उपाययोजना

Admin in the pool! | प्रशासन तळ्यात-मळ्यात!

प्रशासन तळ्यात-मळ्यात!

Next

सातारा : सातारा शहरातील गणेश विसर्जनासंदर्भात उच्च न्यायालयाच्या कथित निर्णयानुसार हेरिटेज वास्तूंची जपणूक लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यायचा आहे. ऐतिहासिक मंगळवार तळ्यात मागील वर्षी शहरातील सर्वच सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन झाले होते. घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी पालिकेने कृत्रिम तळ्यांची अनोखी संकल्पना गतवर्षीच राबविली होती. जलप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मंगळवार तळ्यातील विसर्जनाचा प्रश्न रडारवर आहे, याबाबत जिल्हा प्रशासन काय निर्णय घेणार, याकडे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींचे लक्ष लागून राहिले आहे.
सातारा शहराला सार्वजनिक गणेशोत्सवाची मोठी परंपरा आहे. दिवसेंदिवस घरगुती गणेशमूर्ती बसविण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याचबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या संख्येने दरवर्षी वाढ होताना पाहायला मिळते. पूर्वीच्या नैसर्गिक रंगांपासून बनविलेले माती अथवा शाडूचे गणपती कमी होऊन त्याजागी प्लास्टर आॅफ पॅरीस पासून बनविलेले व त्यांना विषारी रंगांचा वापर केलेले गणेशमूर्ती बनविण्यावर मोठा भर वाढू लागला आहे. सातारा शहरात असणाऱ्या ऐतिहासिक तळ्यांमध्येच परंपरेनुसार गणेशमूर्तींचे विसर्जन केले जात असल्याने गणेश मूर्तींवरील विषारी रंगांमुळे व प्लास्टर आॅफ पॅरीसमुळे तळ्यांतील जलचर प्राणी मृत पावतात. यामुळे तळ्यांच्या आजूबाजूला असलेल्या लोकवस्तीमध्ये दुर्गंधी पसरून लोकांना त्रास सोसावा लागतो. बोअरिंगचे पाणीही दूषित होते. त्याचबरोबर तळ्यांशेजारच्या घरांतील भांडी काळी पडतात. लोकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते.
या पार्श्वभूमीवर तळ्यांतील मूर्ती विसर्जनाला बंदी घालण्यात यावी, या आशयाची याचिका सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर मूर्ती विसर्जनाविषयक मार्गदर्शक तत्त्वे व हेरिटेज साईट जतन करण्याबाबतचे नियम यांच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील कार्यवाही करावी व विसर्जनासाठी पर्यायी व्यवस्था करावी, असे आदेश दिले आहेत. दरम्यान, सातारा पालिकेने फुटका तलाव, मोती तळे या लोकवस्तीत असणाऱ्या तळ््यांमध्ये मूर्ती विसर्जनास बंदी करणारा ठराव गतवर्षी मंजूर केलेला आहे. गतवर्षी विसर्जनाबाबतीत पालिकेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते. हुतात्मा उद्यान, दगडी शाळा व कर्मवीर उद्यान, गोडोली येथे कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते.
शहरातील सहा ते सात हौदांची स्वच्छता करून घेऊन हे हौदही मूर्ती विसर्जनासाठी उपलब्ध करण्यात आले होते. नगरपालिकेचा पोहण्याचा तलावही मूर्ती विसर्जनासाठी खुला करण्यात आला होता. मागील वर्षी मंगळवार तळ्यातील मूर्ती विसर्जनसासाठी ऐनवेळी हिरवा कंदील दाखविण्यात आला होता. त्यामुळे मूर्ती विसर्जनाच्याबाबतीत यावर्षीही पालिकेने अशा उपाययोजना केल्यास कोंडी टळू शकते. (प्रतिनिधी)

मागील वर्षीचे
गणेश विसर्जन
गोडोली कृत्रिम तळे
सार्वजनिकघरगुती
१००४००
हुतात्मा उद्यान
घरगुती२५०
दगडी शाळा
घरगुती२००
मंगळवार तळे
सार्वजनिकघरगुती
२५०१५००
ऐतिहासिक हौद
घरगुती१५०

गणेश विसर्जनाबाबतीत न्यायालयाने काय निर्णय घेतलाय?, याची प्रत अद्याप मला मिळालेली नाही. त्यामुळे विसर्जनाबाबतीत काय निर्णय घ्यायचा, याचे ठरविलेले नाही; पण निकालाची प्रत मिळताच निर्णय घेऊ.
- अश्विन मुदगल, जिल्हाधिकारी

सातारा पालिकेने गतवर्षी राबविलेला कृत्रिम तळ्यांचा उपक्रम लोकांना अत्यंत आवडला. या उपायांमुळे ऐतिहासिक तळ्यांतील जलप्रदूषण थांबले. याहीवर्षी सकारात्मक निर्णयासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
- अभिजित बापट, मुख्याधिकारी, सातारा पालिका

Web Title: Admin in the pool!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.