साथरोग प्रतिबंधासाठी प्रशासन सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:42 AM2021-05-27T04:42:03+5:302021-05-27T04:42:03+5:30

सातारा : सातारा पालिका व जिल्हा परिषदेच्या हिवताप विभागाने साथरोग प्रतिबंधासाठी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात ...

The administration moved for the prevention of communicable diseases | साथरोग प्रतिबंधासाठी प्रशासन सरसावले

साथरोग प्रतिबंधासाठी प्रशासन सरसावले

Next

सातारा : सातारा पालिका व जिल्हा परिषदेच्या हिवताप विभागाने साथरोग प्रतिबंधासाठी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात जंतुनाशन औषध व धूर फवारणी करणे, डेंग्यू व मलेरियाच्या अळ्या शोधून नष्ट करणे, नागरिकांमध्ये प्रबोधन करणे अशी कामे या पथकाने सुरू केली आहेत.

दरवर्षी पावसाळा सुरू झाला की, शहरात साथरोगांचे संक्रमण झपाट्याने वाढते. हे रोखण्यासाठी पालिका प्रशासन व जिल्हा परिषदेच्या हिवताप विभागाने आतापासून कंबर कसली आहे. शहरासह हद्दवाढीत नव्याने समाविष्ट झालेल्या शाहूपुरी, खेड, विलासपूर, शाहूनगर आदी भागांत औषध व धूर फवारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. शहरातील सर्व प्रभागांत ही मोहीम टप्प्याटप्प्याने राबविली जाणार असून, प्रारंभी सर्वाधिक दाट लोकवस्ती असलेल्या सदर बझार व लक्ष्मी टेकडीकडे पथकाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

या भागात साथरोगांचे संक्रमण वेगाने होते. डेंग्यू, चिकनगुनिया व मलेरियाच्या डासांची उत्पत्ती या भागात सातत्याने होत असते. अशा आजाराचे सर्वाधिक रुग्ण या भागातच आढळून येतात. त्यामुळे पालिका व हिवताप विभागाच्या पथकाने या भागात औषध व धूर फवारणीबरोबरच डासांच्या अळ्या शोधून नष्ट करणे, उघडी गटारे बंदिस्त करणे, ओढे व गटारांची स्वच्छता, उघड्यावरील पाण्याची डबकी मुजविणे व नागरिकांमध्ये प्रबोधन करणे, अशी कामे प्राधान्याने हाती घेतली आहेत.

मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत आरोग्य विभाग प्रमुख शैलेश आष्टेकर, आरोग्य निरीक्षक सागर बडेकर व हिवताप विभागाचे आरोग्यसेवक सहभागी झाले आहेत.

(चौकट)

नागरिकांनी हे करावे...

- घराच्या सभोवतालचे खड्डे मुजवावेत. गटारे वाहती ठेवावी.

- इमारतीवरील टाक्या, हौद यांना घट्ट झाकणे बसवावी.

- दारे व खिडक्यांना डास प्रतिबंधक जाळ्या बसविणे.

- घरातील भंगार साहित्य, बाटल्या, टायर यांची विल्हेवाट लावावी.

- घरातील कूलर, फुलदाण्या स्वच्छ करून कोरड्या कराव्यात.

- दैनंदिन पिण्याचे पाणी गाळून व उकळून प्यावे.

- आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा.

फोटो : २६ जावेद खान/ प्रुफ

सातारा पालिकेच्या वतीने शहरात फॉगिंग मशीनद्वारे धूर फवारणी केली जात आहे. (छाया : जावेद खान)

Web Title: The administration moved for the prevention of communicable diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.