पुसेसावळीत कोविड सेंटरसाठी प्रशासन सकारात्मक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:33 AM2021-05-03T04:33:18+5:302021-05-03T04:33:18+5:30
पुसेसावळी : वर्धन ॲग्रोचे चेअरमन धैर्यशील कदम यांनी उपोषणाचा इशारा दिल्याने तहसीलदार किरण जमदाडे यांनी पुसेसावळीत जागेची प्रत्यक्ष ...
पुसेसावळी : वर्धन ॲग्रोचे चेअरमन धैर्यशील कदम यांनी उपोषणाचा इशारा दिल्याने तहसीलदार किरण जमदाडे यांनी पुसेसावळीत जागेची प्रत्यक्ष पाहणी करून कोरोना सेंटर उभे करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे. पुसेसावळी परिसरातील ग्रामस्थांना यामुळे दिलासा मिळणार आहे.
पुसेसावळी परिसरातही सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे लोकांना उपचारासाठी वडूज, औंध, कऱ्हाड, सातारा मायणीला जाण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे परिसरातील लोक हवालदिल झाले आहेत. लोकांची अगतिकता जाणून आणि वर्धन ॲग्रोचे चेअरमन धैर्यशील कदम यांनी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात पुसेसावळी आणि काशिळ येथे कोरोना सेंटर सुरू करण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. शासनाने कोरोना सेंटर उभे न केल्यास ५ एप्रिलपासून उपोषणाचा इशारा दिला होता.
त्यामुळे शासनाने त्यांच्या मागणीचा विचार करून पुसेसावळी काशीळ येथे कोरोना सेंटरसाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे.
पुसेसावळी येथील दिवंगत डी. पी. कदम प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या जागेची तहसीलदार किरण जमदाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. युनूस शेख, धैर्यशील कदम, सरपंच दत्तात्रय रुद्रके, उपसरपंच डॉ. राजू कदम, डॉ. अमित ठिगळे, मंडलाधिकारी धनंजय भोसले, ग्रामसेवक के. डी. भोसले, तलाठी योगेश परदेसी आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत पाहणी करून चर्चा करण्यात आली.