पुण्यतिथीच्या खर्चार्ला फाटा देत विद्यार्थ्यांना घेतले दत्तक !
By admin | Published: June 21, 2017 03:14 PM2017-06-21T15:14:51+5:302017-06-21T15:14:51+5:30
हाके बंधुंचा उपक्रम : खंडाळा तालुक्यात आदर्शवत काम; समाजातून कौतुक
आॅनलाईन लोकमत
खंडाळा , दि. २१ : दिवंगत पूर्वजांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांची पुण्यतिथी साजरी करण्याची प्रथा आजही समाजात रूढ आहे. पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी हजारो रुपये खर्च केले जातात. मात्र शिवाजीनगर, ता. खंडाळा येथील हाके बंधुंनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ पुण्यतिथीच्या खचार्ला फाटा देऊन शालेय विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या वार्षिक खर्चाची जबाबदारी स्विकारली आहे. या अभिनव उपक्रमाद्वारे समाजाला नवी दिशा देण्याचा त्यांनी धाडसी प्रयत्न केला आहे, त्याबद्दल त्यांचे तालुक्यातून कौतुक होत आहे.
शिवाजीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते दिवंगत रामचंद्र हाके यांच्या स्मरणार्थ त्यांचे दोन्ही चिरंजीव हरळी वैष्णव पतसंस्थेचे अध्यक्ष नानासाहेब हाके आणि विकास सेवा सोसायटीचे संचालक लक्ष्मण हाके यांनी पारंपरिक पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा त्या पैशाचा उपयोग समाजातील गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणासाठी झाला तर ती खऱ्या अथार्ने आदरांजली ठरेल. असा विचार करून त्यांनी अहिरे, म्हावशी, पारगाव, बावडा, भादवडे व शिवाजीनगर येथील प्राथमिक शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक खचार्साठी दत्तक घेतले आहे.
शाळेच्या सुरुवातीलाच त्यांना शालेय दफ्तर, वह्या, कंपास पेटी, गणवेश तसेच इतर शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्या वषार्ची सुरुवात आनंददायी करुन दिली. त्यांचे हे काम इतरांना आदर्शवत ठरले आहे.