आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी आगाऊ करभरणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:39 AM2021-04-04T04:39:29+5:302021-04-04T04:39:29+5:30
दरम्यान, पहिल्याच दिवशी एकूण सहा जणांनी आगाऊ कर भरला असून, पालिकेकडे सुमारे ७२ हजारांचा कर जमा झाला आहे. त्याबद्दल ...
दरम्यान, पहिल्याच दिवशी एकूण सहा जणांनी आगाऊ कर भरला असून, पालिकेकडे सुमारे ७२ हजारांचा कर जमा झाला आहे. त्याबद्दल संबंधित मिळकतधारकांचा पालिकेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
पालिका हद्दीत २०२०-२१ या आर्थिक वर्षात १८ हजार मालमत्ताधारक होते. त्यापैकी काही मालमत्ताधारकांची ५० हजारांपेक्षा जास्त थकबाकी होती. त्यामुळे चालू कर व थकबाकी वसूल करण्यासाठी कर विभागाने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. थकीत कराच्या वसुलीसाठी मिळकत सील करणे, नळ कनेक्शन बंद करणे, सार्वजनिक ठिकाणी नावे प्रसिद्ध करणे अशा स्वरूपाची कारवाई केली. २०२०-२१ या आर्थिक वर्षात ४ कोटी २५ लाख कर वसुलीचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यापैकी ३ कोटी ६० लाखांहून अधिक कर वसूल केला आहे.
दरम्यान, ३१ मार्च रोजी हे आर्थिक वर्ष संपल्यानंतर एक एप्रिल रोजी पुढील २०२१-२२ या आर्थिक वर्षाला सुरुवात झाली. त्यावेळी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच १ एप्रिल रोजी गोविंदराव इंगवले यांनी पुढील वर्षाचा आगाऊ कर भरला. त्यामुळे कर विभागप्रमुख राजेश काळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मनोहर पालकर, तेजस शिंदे, बाजीराव येडगे, अतुल सुतार उपस्थित होते.
फोटो : ०३केआरडी०३
कॅप्शन : मलकापूर पालिकेत आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी १ एप्रिल रोजी कर भरण्याचा मान गोविंदराव इंगवले यांनी मिळवला. त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.