बाधित रुग्णांची शासकीय कोरोना सेंटरकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:46 AM2021-08-18T04:46:15+5:302021-08-18T04:46:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वडूज : कोरोनाबाधितांवर केवळ प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आणि आधारासाठी औषधोपचार केला जातो. काही बाधितांना इतर आजाराने ...

Affected patients rushed to the government corona center | बाधित रुग्णांची शासकीय कोरोना सेंटरकडे धाव

बाधित रुग्णांची शासकीय कोरोना सेंटरकडे धाव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

वडूज : कोरोनाबाधितांवर केवळ प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आणि आधारासाठी औषधोपचार केला जातो. काही बाधितांना इतर आजाराने ग्रासल्यामुळे खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले जाते; परंतु बहुतांशी बाधित रुग्ण शासकीय कोरोना सेंटरमध्येच दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे.

वडूजमधील जम्बो कोरोना सेंटरचे काम अंतिम टप्प्यात असून हे सेंटर तालुक्यातील जनतेला दिलासा देणारे ठरणार आहे. कोरोना संसर्गजन्य तपासण्या कमी होत असल्याने रुग्ण संख्येत घट दिसत आहे. मात्र, होत असलेल्या तपासण्यांपैकी पन्नास टक्के नागरिक बाधित असल्याचेही पहावयास मिळत आहे. यातील इतर आजार असलेले रुग्ण भीतीपोटी खासगी दवाखान्यात दाखल होत आहेत. इतर आजार नसलेले आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे असेच बाधित शासकीय सेंटरला उपचार घेत आहेत. खासगी दवाखान्यात न जाण्याची अनेक कारणे असून खटाव तालुक्यात याबाबत परिस्थिती थोडी वेगळी आहे. बाधित रुग्णांचा शासकीय यंत्रणेवर विश्वास जादा असल्याने व खासगी दवाखान्याची फी परवडणारी नसल्याने शासकीय कोरोना व कोरोना सेंटरमध्येच बहुतांशी रुग्ण उपचार घेताना आढळून येत आहेत.

खटाव तालुक्यात बाधित २१,१०५ पैकी १९,१३२ रुग्ण बरे झालेले आहेत. यामध्ये ५१७ जणांना जीव गमवावा लागला. सध्या ९५७ बाधित रुग्ण ठिकठिकाणी उपचार घेत आहेत. ६२२ बाधित रुग्ण गृहविलगीकरणात असून १२८ बाधित रुग्ण वडूज, औंध, पडळ येथे कोरोना केअर सेंटरला उपचार घेत आहे, तर १४२ बाधित रुग्ण पुसेगाव, खटाव व पुसेसावळी येथील कोरोना सेंटरला उपचार घेत आहेत. ४२ बाधित रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात दाखल आहेत. उर्वरित २३ बाधित रुग्ण वडूज, सातारा , कोरेगाव व कऱ्हाड येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. खटाव तालुक्यात २.४५ टक्के मृत्यूचे प्रमाण, ९४ टक्के रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे.

चौकट

भरमसाट अनामतमुळे नातेवाईक त्रस्त

कोरोना बरोबरीने इतर आजाराची लक्षणे दिसल्याने अनेक बाधित रुग्ण भयभीत होऊन उपचारासाठी त्यांचा कल खासगी दवाखान्याकडे वाढत होता; परंतु खासगी दवाखान्यात दाखल होण्यापूर्वीच अनामत रक्कम भरमसाट आकारली जात असल्याने नातेवाइकांचे हाल होत होते; परंतु तेथील उपचार होऊन रुग्णांसाठी खात्री संदर्भात शंकाकुशंकाचे प्रमाण वाढल्याने सध्या बाधित रुग्णांचा कल शासकीय कोरोना सेंटरकडे वाढला आहे. रुग्णांसाठी वडूज येथील जम्बो कोविड सेंटर वरदान ठरणार असून काही दिवसांतच ते रुग्ण सेवेत दाखल होईल.

Web Title: Affected patients rushed to the government corona center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.