मध्यमवर्गीयांसाठी स्वस्तात घर हा इतरांसाठी प्रेरणादायी प्रकल्प : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:42 AM2021-09-26T04:42:10+5:302021-09-26T04:42:10+5:30

कऱ्हाड : गरीब व मध्यमवर्गीय लोकांसाठी स्वस्तात घर देण्याचा प्रकल्प श्रीकृष्ण व्हॅलीमध्ये चरेगावकर बंधूंनी सत्यात उतरविला आहे. त्यांचे ...

Affordable housing for middle class is an inspiring project for others: Nitin Gadkari | मध्यमवर्गीयांसाठी स्वस्तात घर हा इतरांसाठी प्रेरणादायी प्रकल्प : नितीन गडकरी

मध्यमवर्गीयांसाठी स्वस्तात घर हा इतरांसाठी प्रेरणादायी प्रकल्प : नितीन गडकरी

Next

कऱ्हाड : गरीब व मध्यमवर्गीय लोकांसाठी स्वस्तात घर देण्याचा प्रकल्प श्रीकृष्ण व्हॅलीमध्ये चरेगावकर बंधूंनी सत्यात उतरविला आहे. त्यांचे हे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी आहे. भविष्यात शेणापासून रंगनिर्मिती व कापडी चिंधीपासून चादर निर्मिती या प्रकल्पाचा त्यांनी विचार करावा,’ अशी अपेक्षा केंद्रीय परिवहन तथा रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

विंग (ता. कऱ्हाड) येथील चरेगावकर ब्रदर्स ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे विकसित केलेल्या श्रीकृष्ण व्हॅली या बहुउद्देशीय प्रकल्पास शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचा प्रारंभ करण्यात आला. त्या कार्यक्रमात मंत्री गडकरी बोलत होते.

कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार आनंदराव पाटील, कराड अर्बन बँकेचे कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव, कृष्णा बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. (वा.प्र.)

फोटो

विंग (ता. कऱ्हाड) येथे श्रीकृष्ण व्हॅली बहुउद्देशीय प्रकल्पात उभारण्यात आलेल्या टर्फचे उद्घाटन करताना मंत्री नितीन गडकरी, चंद्रकांत पाटील, शेखर चरेगावकर व मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Affordable housing for middle class is an inspiring project for others: Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.