२१ वर्षांनंतर खंडाळा कारखान्याचे भाग्य उजळले !
By admin | Published: March 25, 2016 09:21 PM2016-03-25T21:21:05+5:302016-03-25T23:36:57+5:30
बॉयलर अग्निप्रदीपन : तालुक्यातील औद्योगिक विकासाची नांदी; मदन भोसले
खंडाळा : ‘खंडाळा कारखान्याचे एकविसाव्या वर्षात भाग्य उजाळले असले तरी सांघिक प्रयत्नातून या साखर कारखान्याची उभारणी होऊन झालेला पहिला बॉयलर अग्निप्रदीपन ही भविष्यातील खंडाळा तालुक्यातील कृषी औद्योगिक विकासाची नांदी आहे,’ असा विश्वास किसन वीर-खंडाळा-प्रतापगड परिवाराचे प्रमुख मदन भोसले यांनी व्यक्त केला.
किसन वीर-खंडाळा सहकारी साखर उद्योगाच्या पहिल्या बॉयलरचे अग्निप्रदीपन सीमा संजय पवार, जयश्री अनिल महांगरे, समिंद्रा शांताराम माळ, अनिता बापू माने, अनुसया जयसिंग कदम (तोंडल) या उभयतांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी किसन वीरचे उपाध्यक्ष गजानन बाबर, खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव गाढवे, उपाध्यक्ष व्ही. जी. पवार, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव बाबर, मिटकॉन कन्सलटंन्सीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रदीप बावडेकर, सेवानिवृत्त साखर संचालक डी. बी. गावीत, आर्थिक सल्लागार एन. एस. पाटील, जिजाबा पवार, डॉ. विनय जोगळेकर, ए. बी. जाधव, एन. बी. पाटील आदी उपस्थित होते.
मदन भोसले म्हणाले, ‘दोन्ही कारखान्याचे संचालक, सभासद शेतकरी, विविध कंपन्यांचे कंत्राटदार यांच्या अथक प्रयत्नातून उभ्या राहिलेल्या खंडाळा कारखान्याचा पुढील हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू होईल, त्यावेळी शेतकऱ्यांना शेअर्स घ्या म्हणण्याची वेळ येणार नाही. येणारी संकटे तुडवत जाण्याचे काम आम्ही करतो. कारखान्याच्या सर्वच घटकांनी आपल्या वाटेल्या आलेल्या भूमिका कणखरपणे निभवाव्यात,’ असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी शंकरराव गाढवे, डॉ. प्रदीप बावडेकर, गजानन बाबर डॉ. विनय जोगळेकर, व्ही. जी. पवार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शेतकरी, विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाबा लिमण, दत्तात्रय शेवते, विकास कदम यांनी सूत्रसंचालन केले. संचालक नंदकुमार निकम यांनी स्वागत केले. संचालक रतनसिंह शिंदे यांनी आभार
मानले. (प्रतिनिधी)