कोयना धरणातून २४ दिवसानंतर 'इतक्या' क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 05:26 PM2023-07-24T17:26:52+5:302023-07-24T17:27:20+5:30

कोयना धरणात ५३.६९ टीएमसी पाणीसाठा

After 24 days water release from Koyna dam starts, vigilance warning to riverside villages | कोयना धरणातून २४ दिवसानंतर 'इतक्या' क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

कोयना धरणातून २४ दिवसानंतर 'इतक्या' क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

googlenewsNext

निलेश साळुंखे

कोयनानगर : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढल्याने आज, सोमवारी दुपारी चार वाजता धरणाच्या पायथावीजगृहातून १०५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग कोयना नदीत सुरू करण्यात आला. कोयना सिंचन विभागाने याबाबत माहिती दिली. तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला. 

धरण पाणलोट क्षेत्रात गत आठ-दहा दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे पाणीसाठ्यात दररोज सरासरी तीन चार टीएमसीने वाढ होत आहे. १०५.२५ टीएमसी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरण सध्या पन्नास टक्के भरले आहे. पावसाचे प्रमाण वाढत असल्याने कोयना सिंचन विभागाने दि १ जुलैला कोयना नदीतील बंद केलेला पाण्याचा विसर्ग आज, चोवीस दिवसा नंतर पुन्हा सुरू केला आहे.

दुपारी चार वाजता पायथावीजगृहातील एक जनित्र संचातून वीजनिर्मिती करून पुर्वेकडे कोयना नदीत १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. सायंकाळी पाच वाजता कोयना धरणात ५३.६९ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. तर पाण्याची आवक ५९९७७ क्युसेकने सुरू होती. 

दरम्यान एक जून पासून सुरू झालेल्या तात्रिक वर्षात धरणातून पुर्वेला कोयना नदीत ३.११ टीएमसी पाण्याचा विसर्ग केला यामध्ये नदी विमोचकातुन ०.३३ टीएमसी व पायथावीजगृहातुन २.७७ टीएमसी पाण्याचा विसर्ग करत ७.४८१ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे.

Web Title: After 24 days water release from Koyna dam starts, vigilance warning to riverside villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.