उदयनराजेंचा बॅनर फाडल्यानंतर तिघांचे अपहरण करून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 14:27 IST2019-05-27T14:26:47+5:302019-05-27T14:27:50+5:30
सातारा येथील मोती चौकात खासदार उदयनराजे भोसले यांचा असलेला बॅनर फाडल्याचा आरोप करत तिघांचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर उरमोडी धरण परिसरात नेऊन त्यांना मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

उदयनराजेंचा बॅनर फाडल्यानंतर तिघांचे अपहरण करून मारहाण
सातारा : येथील मोती चौकात खासदार उदयनराजे भोसले यांचा असलेला बॅनर फाडल्याचा आरोप करत तिघांचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर उरमोडी धरण परिसरात नेऊन त्यांना मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. खासदार उदयनराजेंचा बॅनर फाडल्याचे लक्षात येताच काही युवकांनी तीन युवकांचे कारमधून शनिवारी सायंकाळी अपहरण केले. त्यांना उरमोडी धरण परिसरात नेले. या ठिकणी त्यांना मारहाण करण्यात आली.
हा प्रकार पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा उरमोडी धरणाकडे गेला. पोलिसांनी सर्व संशयितांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते याही स्वत: शहर पोलीस ठाण्यात आल्या. त्यांनी संशयितांकडे कसून चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.