अखेर श्रमाच्या घामाला मिळालं फळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 11:12 PM2019-07-07T23:12:34+5:302019-07-07T23:12:39+5:30

सातारा : कायम दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यांनी पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदवला. ...

After all, the fruit of slimeish sweat | अखेर श्रमाच्या घामाला मिळालं फळ

अखेर श्रमाच्या घामाला मिळालं फळ

Next

सातारा : कायम दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यांनी पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदवला. त्यामधील १९८ गावांनी तब्बल ५० दिवस घाम गाळून श्रमदान करत लाखो घनमीटरचे जलसंधारणाचे काम केले. त्यानंतर पडलेल्या पहिल्याच पावसात केलेल्या पाणलोटच्या कामामुळे शिवारातील समतल चर, ओढ्या-नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला आहे.
राज्यात दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये अनेक गावांमध्ये दुष्काळ पडल्याने हंडाभर पाण्यासाठी तीन ते चार किलोमीटर वणवण करावी लागते. तर जनावरांच्या चाºयाचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने शेतकºयाला पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलेल्या जनावरांना विकण्याची वेळ येते. त्यानंतर प्रशासन जागे होऊन टँकर आणि चारा छावण्या सुरू करण्याची धडपड करत असते. या दुष्काळी चक्रातून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी चार वर्षांपूर्वी अभिनेता अमीर खान याने पाणी फाउंडेशनची सुरुवात केली. त्यांनी सुरू केलेल्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेली अनेक गावे टँकरमुक्त होऊन जलयुक्त झाली.
यंदाच्या वॉटर कप स्पर्धेत राज्यातील अनेक गावांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. जिल्ह्यातील १९८ गावांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या स्पर्धेच्या निमित्ताने पाण्याबाबत साक्षरता होऊन पडणाºया पावसाचा प्रत्येक थेंब न थेंब वाचवण्याचा दुष्काळग्रस्तांनी निर्धार केला. त्यासाठी अडीच वर्षांच्या बालकापासून ९० वर्षांच्या वृद्धापर्यंत सर्वच जण हातात टिकाव, खोºयाच्या साह्याने शिवारात पाणी साठवण भांडी तयार करण्यासाठी घाम गाळला. अनेक वर्षांपासून राजकारण, निवडणुकीतील गट-तटांमुळे दुंभगलेली मन एकत्र आली. विद्यार्थी, तरुण, नोकरदार, व्यावसायिक, महिल आणि वृद्धांनी एकमेकांच्या मदतीने सलग ५० दिवस श्रमदान केले.
श्रमदान आणि मशीनद्वारे गावोगावी हजारो घनमीटर पाणी क्षमतेची जलसंधारणाची कामे झाली. स्पर्धा संपल्यानंतर सर्वांचे लक्ष मान्सूनच्या आगमनाकडे लागले होते. त्यात मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे पाणलोट विकासाच्या कामांमध्ये पाणी साठले आहे. वाहून जाणारे पाणी ठिकठिकाणी अडवल्यामुळे ते जमिनीत मुरले. पहिल्याच पावसात कोरड्या पडलेल्या कूपनलिका व विहिरी काटोकाट भरल्याने श्रमकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
वृक्षारोपणासाठी पुढाकार
वॉटर कप स्पर्धेच्या काळात अनेक गावांमध्ये पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरविण्यासाठी जलसंधारणाचे काम करण्यात आले. तसेच स्पर्धेचा भाग असलेल्या वृक्षारोपणासाठी उन्हाळ्यात खड्डे खणले होते. पाऊस पडल्याने शिवारात पाणी उपलब्ध झाले. त्या खणलेल्या खड्ड्यांमध्ये गावोगावी वृक्षारोपण करण्याची जोरात सुरुवात झाली आहे.

Web Title: After all, the fruit of slimeish sweat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.