धक्कादायक! ..अन् दफन केलेला मृतदेह पुन्हा काढला बाहेर, साताऱ्यातील सासवड येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 02:41 PM2022-02-05T14:41:19+5:302022-02-05T14:41:44+5:30

सासवड परिसरात दफन केल्यानंतर परत मृतदेह बाहेर काढण्याची पहिलीच वेळ असल्याने मृतदेह पाहून उपस्थितांची मने गहिवरून आली होती

After burial in Saswad area, the body was taken out again | धक्कादायक! ..अन् दफन केलेला मृतदेह पुन्हा काढला बाहेर, साताऱ्यातील सासवड येथील घटना

धक्कादायक! ..अन् दफन केलेला मृतदेह पुन्हा काढला बाहेर, साताऱ्यातील सासवड येथील घटना

Next

आदर्की : सासवड (ता. फलटण) येथील माळी बेंद नावाच्या शिवारात ट्रॅक्टरवरून पडून दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. त्याची लोणंद पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली होती; परंतु तपासाअंती मुलाचे दफन करण्यात आल्याचे समोर आल्याने फलटणचे नायब तहसीलदारांच्या समक्ष मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर जागेवरच शवविच्छेदन करून त्याचे परत दफन करण्यात आले.

सासवड (झणझणे) येथील माळी बेंद नावाच्या शिवारात शुक्रवारी (दि. २८) दुपारी ट्रॅक्टरवरून पडून रुद्र गणेश भुजबळ याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याचा मृत्यू झाला याबद्दल कोणाचीही तक्रार नसल्याने रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून झाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार देवेंद्र पाडवी तपास करीत होते.

मृतदेह दफन केल्याचे समोर आल्याने फलटणचे नायब तहसीलदार डॉ. डी. एस. बोबडे-सावंत यांच्यासमोर लोणंदचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्या उपस्थितीत मृतदेह जेसीबीच्या साहाय्याने काटेरी झुडपे व माती काढली. त्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर बिबी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप खताळ यांनी जागेवरच शवविच्छेदन केले. त्यानंतर पुन्हा दफन करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील अनपट, ग्रामपंचायत सदस्य अमोल रासकर, महेश अनपट, किरण जाधव, गणेश पवार, गणेश भुजबळ, हवालदार अविनाश नलवडे, नाना होले, पोलीस पाटील प्रसाद कुमठेकर, आदी माळी बेंद व सासवडचे ग्रामस्थ उपस्थित होते.

मृतदेह पाहून उपस्थितांची मने गहिवरली

रुद्र भुजबळ याचा अपघाती मृत्यू झाला. त्याचे दफन केले; पण सासवड परिसरात दफन केल्यानंतर परत मृतदेह बाहेर काढण्याची पहिलीच वेळ असल्याने मृतदेह पाहून उपस्थितांची मने गहिवरून आली होती.

नातेवाइकांना कोणताही त्रास देण्याचा हेतू नसून कायदेशीर बाबी तपासून व पुढे नातेवाइकांना त्रास होऊ नये,यासाठी ही प्रक्रिया करण्यात आली. - विशाल वायकर, स. पो. नि., लोणंद

Web Title: After burial in Saswad area, the body was taken out again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.