मुलाच्या आत्महत्येनंतर आईने घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 06:36 PM2018-11-18T18:36:26+5:302018-11-18T18:36:54+5:30
पिंपोडे बुद्रुक : दहावीत शिकत असलेल्या मुलाने आत्महत्या केल्यानंतर याचा मानसिक धक्का सहन न झालेल्या त्याच्या आईने घराच्या छताला ...
पिंपोडे बुद्रुक : दहावीत शिकत असलेल्या मुलाने आत्महत्या केल्यानंतर याचा मानसिक धक्का सहन न झालेल्या त्याच्या आईने घराच्या छताला दोेरीच्या सा'ाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना कोरेगाव तालुक्यातील बिचुकले येथे घडली.
शुभम रवींद्र पवार (वय ) व हेमा रवींद्र पवार अशी आत्महत्या केलेल्या मायलेकरांची नावे आहेत. या घटनेने बिचुकलेसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रवींद्र पवार हे बिचुकले येथे पत्नी हेमा, मुलगी प्रतीक्षा, मुले प्रतीक व शुभम यांच्यासमवेत राहतात. शुभम हा देऊन येथील शाळेत दहावी शिकत होता. शाळांना लागलेल्या दिवाळी सुटीमुळे तो आत्याच्या गावी गेला होता.
शनिवार, दि. १७ रोजी शुभमला त्याचे वडील व भाऊ घरी बिचुकले येथे घेऊन आले. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शुभम घरातून अचानक गायब झाला. कुटुंबातील सदस्यांनी शुभमचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, त्याचा कोठेही थांगपत्ता लागला नाही. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास गुरांच्या गोठ्याबाहेर असलेल्या एका चिंचेच्या झाडाला शुभम गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. ही घटना उघडकीस येतात ग्रामस्थांनी शुभमला तातडीने वाठार येथील रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी डॉक्टरांनी शुभमला मृत घोषित केले.
दरम्यान, काही वेळांनंतर या घटनेची माहिती शुभमची आई हेमा पवार यांना समजली. मुलाच्या आत्महत्येचा मानसिक धक्का सहन न झाल्याने हेमा पवार यांनी घराच्या छताला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली