तपानंतर भरला गोपूजचा तलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:42 AM2017-10-23T00:42:40+5:302017-10-23T00:42:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
औंध : गोपूज येथील व औंध रस्त्यालगत असणाºया तलावाची गळती काढण्यात आली होती. त्यातच यावर्षी चांगला पाऊस झाल्याने पाणीसाठा वाढला. परिणामी तब्बल एक तपानंतर हा तलाव भरल्यामुळे ग्रामस्थांसह, शेतकºयांत समाधानाचे वातावरण आहे. या तलावातील पाण्याचे पूजन मान्यवरांनी केले.
गोपूज, ता. खटाव येथील या तलाव्याला गळती होती. त्यामुळे पाऊस झालातरी पाणीसाठा टिकून राहत नव्हता. परिणामी शेतीसाठी पाणी कमी पडत होते. यामुळे गेल्यावर्षी या तलावाची दुरुस्ती करण्यात आली. तसेच पाणी गळती थांबवण्यात आली होती. यावर्षी या भागात चांगला पाऊस झाला. या पावसाचे पाणी तलावात येऊन चांगला साठा झाला. त्यातच गळती बंद करण्यात आल्याने तलाव एक तपानंतर भरला. त्यामुळे तलाव परिसरातील विहिरींची पाणीपातळी वाढणार आहे. त्याचबरोबर शेतीच्या पाण्याचाही प्रश्न काही प्रमाणात सुटला आहे.
या तलाव्यातील पाण्याचे पूजन माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या हस्ते झाले. यावेळी पंचायत समितीचे सभापती संदीप मांडवे, भिकू कंठे, सरपंच उषा जाधव, विनायक घार्गे, बाबासो घार्गे, संभाजी घार्गे, धनाजी पाटील, दत्तात्रय घार्गे, प्रमोद घार्गे, सुरेश कणसे, रामचंद्र जाधव, प्रथमेश जाधव, संतोष चव्हाण, जयंत
घार्गे, श्रीरंग घार्गे, विजय घार्गे, धनाजी घार्गे, विनोद खराडे, सचिन मोरे उपस्थित होते.
माजी आमदार घार्गे म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून कायम दुष्काळात होरपळणाºया माण-खटावमधील अनेक तलावांची दुरुस्ती करण्यात आली. बंधारे, डीपसीसीटीची कामे झाली. आज निसर्गाच्या कृपेने त्यामध्ये पाणीसाठा झाला आहे. तो केलेल्या कामाची
पोहोचपावती आहे.’