आठ दिवसांनंतर साताऱ्याची बाजारपेठ बहरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 03:16 PM2017-07-22T15:16:01+5:302017-07-22T15:16:01+5:30

शेत-शिवारातील कामेही उघडीप दिल्याने सुुरु

After eight days, the Satara market was reeling | आठ दिवसांनंतर साताऱ्याची बाजारपेठ बहरली

आठ दिवसांनंतर साताऱ्याची बाजारपेठ बहरली

googlenewsNext

आॅनलाईन लोकमत

(जि. सातारा), दि. २२ : गेल्या आठ दिवसांपासून सातारा शहर व परिसरात पावसाचा जोर वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. शुक्रवारी (दि. २१) मात्र, हा जोर काही प्रमाणात ओसरला. अधून-मधून कडक ऊन पडल्याने खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांमुळे बाजारपेठत बहरून गेली. ग्रामीण भागात शेत-शिवारातील कामेही पावसाने उघडीप दिल्याने सुुरु झाली आहेत.

माण, खटाव व फलटण तालुका वगळता गेल्या आठ-दहा दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर वाढल्याने धरणांच्या पाणीपातळीतही लक्षणीय वाढ होत आहे. पावसामुळे सातारा शहर व परिसरातील जनजीवन विस्कळीत झाल्याने बाजारपेठ व भाजीमंडई ओस पडली होती.


शुक्रवारी पहाटेपासूनच पावसाचा जोर ओसरल्याने व अधून-मधून ऊन पडू लागल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी खरेदीसाठी बाजारपेठेत हजेरी लावली. आठ दिवसांनंतर बाजारपेठ ग्राहकांनी बहरून गेली. राजवाडा, महात्मा फुले, पोवई नाका भाजीमंडईत सकाळपासूनच ग्राहकांची गर्दी पहावयास मिळाली.

Web Title: After eight days, the Satara market was reeling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.