कुपनलिकेत पडलेल्या मंगेशचा अकरा तासानंतर मृतदेह काढला बाहेर

By admin | Published: June 27, 2017 12:58 PM2017-06-27T12:58:28+5:302017-06-27T12:59:23+5:30

तब्बल अकरा तासांच्या अथक परिश्रमानंतर सहा वर्षीय मंगेशला कूपनलिकेच्या तीस फूट खोलीतून बाहेर काढण्यात आले, मात्र दुर्दैवाने त्याचा मृतदेहच हाती लागला.

After the eleventh hour of Mangesh's accident, the body was taken out | कुपनलिकेत पडलेल्या मंगेशचा अकरा तासानंतर मृतदेह काढला बाहेर

कुपनलिकेत पडलेल्या मंगेशचा अकरा तासानंतर मृतदेह काढला बाहेर

Next

ऑनलाइन लोकमत

सातारा, दि. 27-  तब्बल अकरा तासांच्या अथक परिश्रमानंतर सहा वर्षीय मंगेशला कूपनलिकेच्या तीस फूट खोलीतून बाहेर काढण्यात आले, मात्र दुर्दैवाने त्याचा मृतदेहच हाती लागला. माण तालुक्यातील विरळीच्या कापूसवाडी शिवारात मंगळवारी मध्यरात्री दोन वाजता मदत कार्य संपुष्टात आले. 
सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास शिवारातील उघड्या कूपनलिकेत पडलेल्या मंगेश अनिल जाधव याला वाचविण्यासाठी तीन जेसीबी, एक पोकलेन, एक रुग्णवाहिका अणि राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे 32 जवान सलग अकरा तास प्रयत्न करीत होते. कूपनलिकेच्या बाजूला तीस फूट खोल खड्डा खणून त्याला चार फूट आडवा चर मारण्यात आला होता. मध्यरात्री दीड वाजता कूपनलिकेचा खालचा खड्डा मोकळा झाल्यानंतर त्यात मंगेशची चप्पल बचाव पथकाला सापडली. त्यानंतर त्याला कसेबसे बाहेर काढण्यात आले. 
मात्र, वरुन माती पडल्यामुळे गुदमरुन त्याचा आतमध्येच मृत्यू झाल्याचे लक्षात आले. मध्यरात्री उशिरापर्यंत घटनास्थळी तळ ठोकून बसलेला जमाव त्याच्या मृत्युमुळे खूप हळहळला. 
दरम्यान, म्हसवडचे सहायक पोलिस निरीक्षक पी.बी. देशमुख म्हणाले, याप्रकरणात कोणाचीही तक्रार आलेली नाही. त्यामुळे गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही. महसूल प्रशासनाच्या निर्णयानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. 

Web Title: After the eleventh hour of Mangesh's accident, the body was taken out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.