प्रत्येक फेरीनंतर विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आनंदी भाव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:13 AM2019-05-24T00:13:08+5:302019-05-24T00:13:13+5:30

सातारा : येथील औद्योगिक वसाहतीतील वखार महामंडळाच्या गोदामात सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. प्रत्येक फेरीनिहाय राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ...

After every round, the cheerful expressions of the workers' faces! | प्रत्येक फेरीनंतर विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आनंदी भाव !

प्रत्येक फेरीनंतर विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आनंदी भाव !

Next

सातारा : येथील औद्योगिक वसाहतीतील वखार महामंडळाच्या गोदामात सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. प्रत्येक फेरीनिहाय राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व खासदार उदयनराजे भोसले यांचे मताधिक्य वाढत होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या चेहºयावर सतत आनंदी भाव दिसून येत होते.
पहिल्या फेरीनंतर...
सकाळी आठनंतर इव्हीएमद्वारे झालेल्या मतमोजणीस सुरूवात झाली. या पहिल्या फेरीचा निकाल नऊनंतर समोर आला. या फेरीत खासदार उदयनराजे भोसले यांनी मताधिक्य घेतल्याचे दिसून आले. उदयनराजेंना २९ हजार ८९६ तर विरोध शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना २१ हजार ५८१ मते मिळाली. तर नोटाला ४१७ मतदारांनी पसंती दिली. या फेरीत नरेंद्र पाटील यांना सातारा विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळाल्याचे दिसून आले. तर उर्वरित मतदारसंघात उदयनराजे पुढे होते.
दुसºया फेरीनंतर...
मतमोजणीच्या दुसºया फेरीचाही निकाल दहानंतर जाहीर करण्यात आला. या फेरीत उदयनराजे यांना २८ हजार ६५५ तर नरेंद्र पाटील यांना २३ हजार ४५० मते प्राप्त झाली. या फेरीत उदयनराजे हे वाई, कोरेगाव, कºहाड उत्तर मतदारसंघात पुढे असल्याचे दिसले. तर नरेंद्र पाटील हे कºहाड दक्षिण, पाटण आणि सातारा विधानसभा मतदारसंघात पुढे राहिले. या फेरीत इतर उमेदवारांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे सहदेव ऐवळे यांनाच सर्वाधिक २१८१ मते मिळाली.
पाचव्या फेरीनंतर...
पहिल्या फेरीनंतर खासदार उदयनराजे भोसले यांचे मताधिक्य वाढत होते. त्यामुळे पाचव्या फेरीत उदयनराजे भोसले यांचे मताधिक्य किती वाढते याकडे सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेले. या फेरीत उदयनराजे यांना ३० हजार २६० मते मिळाली. तर शिवेसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना २३ हजार २३६ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सहदेव ऐवळेंना २२११ मते प्राप्त झाली. या फेरीत ५७ हजार ९६६ मतांची मोजणी करण्यात आली. तर या फेरीत नोटाला ५१६ मते मिळाली. या फेरीतही उदयनराजेंना वाई, कोरेगाव, कºहाड उत्तर, कºहाड दक्षिण आणि सातारा विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळाले. तर नरेंद्र पाटील यांना पाटण मतदारसंघात अधिक मते मिळाली.

आठव्या फेरीनंतर...
आठव्या फेरीला दुपारच्या सुमारास सुरूवात झाली. या फेरीत अपेक्षेप्रमाणे उदयनराजे यांनीच मताधिक्य मिळवले. उदयनराजेंना ३२ हजार ८५ तर नरेंद्र पाटील यांना २२ हजार ४२९ मते मिळाली. नोटाला ४३९ मतदारांनी कौल दिला. या फेरीत वाई, कोरेगाव, कºहाड उत्तर, कºहाड दक्षिण आणि सातारा विधानसभा मतदारसंघाने मताधिक्य दिले. तर नरेंद्र पाटील यांना पाटण विधानसभा मतदारसंघात अधिक मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे सहदेव ऐवळे यांना २२६१ मते मिळाली.
दहाव्या फेरीनंतर...
मतमोजणीच्या दहाव्या फेरीत उदयनराजे भोसले यांना ३१ हजार ५८९ तर नरेंद्र पाटील यांना २५ हजार ८४५ मते मिळाली. या खालोखाल सहदेव ऐवळे यांना २१०६, सागर भिसे ४९४, पंजाबराव पाटील ४४३, आनंद थोरवडे ३८४, दिलीप जगताप २९२, शैलेंद्र वीर २९१ तर अभिजित बिचुकले यांना ११७ मते प्राप्त झाली. तर नोटाला ४३४ मतदारांचा कौल मिळाला. या फेरीत नरेंद्र पाटील यांनी वाई आणि पाटण विधानसभा मतदारसंघात उदयनराजेंच्या विरोधात मताधिक्य मिळवले.
पंधराव्या फेरीनंतर..
मतमोजणीच्या पंधराव्या फेरीत उदयनराजे हे नरेंद्र पाटील यांच्या पुढे होते. उदयनराजेंना ३१ हजार ३०८ तर नरेंद्र पाटील यांना २५ हजार ५२८ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सहदेव ऐवळे यांना २३७२ मते प्राप्त झाली तर नोटाला ५१३ मते मिळाली. या फेरीत ऐकूण ६१ हजार ५९३ मतांची मोजणी करण्यात आली. उदयनराजेंना वाई, कोरेगाव, कºहाड उत्तर, सातारा विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळाले. तसेच नरेंद्र पाटील यांना कºहाड दक्षिण आणि पाटण मतदारसंघात अधिक मते मिळाली.
विसाव्या फेरीनंतर..
मतमोजणीच्या विसाव्या फेरीतही उदयनराजे हेच पुढे होते. या फेरीत उदयनराजेंना १२ हजार ३५८, नरेंद्र पाटील यांना ८ हजार २९४ मते मिळाली. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सहदेव ऐवळे यांना ६४१ मते प्राप्त झाली. उदयनराजेंना वाई, पाटण आणि सातारा विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळाले.

Web Title: After every round, the cheerful expressions of the workers' faces!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.