परिक्षेनंतर विद्यार्थ्यांनी घेतला समुह भोजनाचा आस्वाद

By Admin | Published: April 3, 2017 06:19 PM2017-04-03T18:19:19+5:302017-04-03T18:19:19+5:30

विडणी ता. फलटण येथील उत्तरेश्वर विद्यालयाचा अनुकरणीय उपक्रम

After the exam, the students took part in lunch | परिक्षेनंतर विद्यार्थ्यांनी घेतला समुह भोजनाचा आस्वाद

परिक्षेनंतर विद्यार्थ्यांनी घेतला समुह भोजनाचा आस्वाद

googlenewsNext

आॅनलाईन लोकमत

फलटण : उत्तरेश्वर विद्यालय व ज्यु .काँलेजने एस.एस.सी. बोर्ड परीक्षा केद्रास परिक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांना ग्रामस्थाच्या वतीने भोजन देऊन स्तुत्य असा उपक्रम राबवल्या बद्दल विद्यार्थी व पालक वगार्तून उपक्रमा बद्दल विद्यालयाचे समाधान व्यक्त केले .


विडणी ता. फलटण येथील उत्तरेश्वर विद्यालय व ज्यु.काँलेज मध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शहरात एस.एस. सी. बोर्ड परिक्षे साठी मोठी धांदल उडायची त्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक तणावाखाली परिक्षा द्यावी लागत असल्याचे अनेक पालकानी नाराजी व्यक्त केल्याने सस्थेचे सचिव सहदेव शेडे यांनी बोर्डा कडे पाठपुरावा करुन विद्यालयात एस.एस.सी. बोर्ड परिक्षा केद्र सुरू करणेत यश आले.


उत्तरेश्वर विद्यालयात एस.एस.सी बोर्ड परिक्षा केद्र पहिले वर्षे सुरू करणेत आल्याने या केद्रात पूर्व भागातील सहा शाळेतील ३५४ विद्यार्थी परिक्षेसाठी व्यवस्था करून परिक्षेच्या पहिल्या दिवशी विद्यालय व ग्रामस्थानी विद्याथ्याचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करून परिक्षासाठी शुभेछा दिल्या.


परिक्षेच्या शेवटच्या दिवशी सुद्धा विद्यालयाचे सचिव सहदेव शेडे व गावातील अन्नदाते यांनी पेपर संपवल्यावर विद्यालयात छोटाशा कार्यक्रम आयोजन करून विद्यार्थ्यांना भोजनाचा आस्वाद देऊन सवार्ना या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचा सुखद धक्का दिला .


यावेळी सस्थेचे सचिव सहदेव शेडे म्हणाले की विद्यालयात प्रथमच बोडार्ची परिक्षा होत असल्याने थोडेसा सर्वावर तणाव होता परंतु शिक्षक वर्ग व ग्रामस्थाच्या सहकार्या मुळेच परिक्षा पारदर्शक पणे सुरळीत पणे पार पाडल्या सवार्चे आभार व्यक्त करुन धन्यवाद मानले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शहरात परिक्षा देताना दबाव यायचा पण आता ग्रामीण भागात मोकळ्या वातावरणात परिक्षा देताना मुलांची गुणवत्ता वाढत असल्याचे पाहावयास मिळत आहे मत व्यक्त केले.


यावेळी उपकेद्र प्रमुख हु़बे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास सरपंच राजीव पवार मारुती नाळे अनिल शेडे. विठ्ठल नाळे, महादेव शेडे रोहीदास बनकर, किशोर ननावरे, प्राचार्य डी. एन. पवार, एम. आर. नाळे आदीची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली पवार यांनी केले. आभार सोनवलकर यांनी मानले. दरम्यान एस.एस.सी.परिक्षा बोर्ड सुरळीत पार पाडल्या बद्दल केद्रप्रमुख निबाळकर,उपकेद्र प्रमुख हुबे,  त्याचे सहकारी याचे स्वागत सरपंच राजीव पवार यांच्या करणेत आला. (प्रतिनिधी)

Web Title: After the exam, the students took part in lunch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.