दीर्घ कालावधीनंतर पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग होणार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:39 AM2021-01-20T04:39:00+5:302021-01-20T04:39:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : शासनाने २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी परवानगी दिली ...

After a long period, classes from fifth to eighth will continue | दीर्घ कालावधीनंतर पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग होणार सुरू

दीर्घ कालावधीनंतर पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग होणार सुरू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : शासनाने २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. शिक्षण विभागाने शासनाच्या सूचना प्राप्त होताच अंमलबजावणीची तयारी दर्शविली आहे. शिवाय सध्या नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू असल्याने शाळांचीही पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास तयारी आहे. पालकांनीही शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

गतवर्षी मार्चपासून विद्यार्थी घरी आहेत. कोरोनामुळे यावर्षी आतापर्यंत ऑनलाइन अध्यापन सुरू होते. मात्र कोरोना रुग्णांची घटती संख्या व लसीकरणाची मोहीम सुरू झाल्याने पालकांमधीलही भीती कमी झाली आहे. मोबाइलद्वारे अध्यापनाच्या सवयीमुळे एकलकोंडी बनलेल्या मुलांना आता मित्रांमध्ये मिसळता येणार असून, ऑनलाइनऐवजी प्रत्यक्ष अध्यापनामुळे अभ्यासाचाही ताण काही अंशी कमी होणार असल्याने पालकही समाधानी आहेत.

कोरोनामुळे शासकीय नियमावलींचे पालन करून अध्यापनाची तयारी शाळांनी दर्शविली आहे. बहुतांश शाळा शासकीय आदेशाच्याच प्रतीक्षेत होत्या. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवसापासून शाळा गजबजणार आहेत.

विद्यार्थी उपस्थितीची शंभरी अद्यापही नाहीच

जिल्ह्यात इयत्ता नववी ते बारावीपर्यंत शाळा आणि महाविद्यालयांचे वर्ग दि. २३ नोव्हेंबरपासून सुरू झाले. मात्र पहिल्या दिवशी फारसा प्रतिसाद लाभला नव्हता. मात्र टप्याटप्याने शाळा सुरू झाल्या. शाळा सुरू होण्याचे प्रमाण सुधारले मात्र विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण अद्यापही १०० टक्के असल्याचे दिसत नाही. पालकांच्या डोक्यातून अद्यापही कोरोनाचे खूळ जात नसल्यामुळे संमतिपत्र देण्यास ते नकार देत आहेत. लसीकरण सुरू झाल्यामुळे विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे. पालकांचा सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे.

प्रतिक्रिया

वगार्तील प्रत्यक्ष अध्यापन व ऑनलाइन अध्यापनात फरक आहे. त्यामुळे शाळा सुरू करणे आवश्यक होते. यामुळे मुलांना त्यांच्या वयाच्या मुलांबरोबर खेळता येईल.

- अंजली जाधव, पालक

कोरोनामुळे मोबाइल, टीव्हीसमोर राहून मुले कंटाळली आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर प्रत्यक्ष वर्गातील अध्यापनास मुलांचा चांगला प्रतिसाद मिळेल, याची खात्री वाटते.

- विनीत पाटील

पालक

शाळांकडून चांगली काळजी घेण्यात येते. शिवाय मुलांमध्येही चांगला बदल झाला आहे. त्यामुळे शासनाने शाळा सुरू करण्याबाबत घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे.

- पांडुरंग पवार,

पालक

शासनाच्या सूचना प्राप्त होताच वर्ग सुरू करण्याबाबतची कार्यवाही केली जाणार आहे. शाळांनीही तयारी दर्शविली असून, शासकीय नियमावलीचे काटेकोर पालन केले जाणार आहे.

- प्रभावती कोळेकर,

शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

जिल्ह्यातील विद्यार्थी संख्या

पाचवी

सहावी

सातवी

आठवी

Web Title: After a long period, classes from fifth to eighth will continue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.