भेळ खाल्ल्यानंतर पैसे मागितल्याने व्यावसायिकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 01:20 PM2019-06-20T13:20:03+5:302019-06-20T13:20:50+5:30
सातारा : भेळ खाऊन झाल्यानंतर पैसे मागितले, या कारणावरून भेळ व्यावसायिकाला तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना कोडोली येथील गणेश ...
सातारा : भेळ खाऊन झाल्यानंतर पैसे मागितले, या कारणावरून भेळ व्यावसायिकाला तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना कोडोली येथील गणेश चौकात बुधवारी सायंकाळी सहा वाजता घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तिघांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जीवन रावते, अभिजीत (रा. दत्तनगर, कोडोली) यांच्यासह एक एका अनोळखीवर गुन्हा दाखल झाला आहे. सुरेशकुमार शंकरलाल डांगी (वय ३४, रा. विजयनगर, कोडोली सातारा) या व्यावसायिकाचा कोडोली येथील गणेश चौकात भेळचा गाडा आहे.
बुधवारी सायंकाळी जीवन रावतेसह अन्य तिघे तेथे भेळ खाण्यासाठी तेथे आले. डांगी यांनी त्यांना भेळ खाण्यास दिली. त्यानंतर हे तिघे पैसे न देताच तेथून जात होते. त्यामुळे डांगी यांनी तिघांकडे भेळ खाल्ल्याचे पैसे मागितले. त्यामुळे चिडून जाऊन या तिघांनी डांगी यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. त्यांचा मुलगा प्रकाश याच्या खिशातील १२०० रुपयांची रोकडही जाताना त्या तिघांनी जरदस्तीने चोरून नेली.
या घटनेनंतर डांगी यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्या तिघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिघेही सापडले नाहीत.