उदयनराजेंच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 11:08 PM2018-10-29T23:08:52+5:302018-10-29T23:09:37+5:30

सातारा : सातारा विकास आघाडीचे नगरसेवक विशाल जाधव यांनी आरोग्य विभागाचे मुकादम दिलीप सकटे यांना केलेल्या शिवीगाळ व दमदाटी ...

After the mediation of Udayanrajanj, the movement back | उदयनराजेंच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे

उदयनराजेंच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे

Next

सातारा : सातारा विकास आघाडीचे नगरसेवक विशाल जाधव यांनी आरोग्य विभागाचे मुकादम दिलीप सकटे यांना केलेल्या शिवीगाळ व दमदाटी प्रकरणाच्या निषेधार्थ पालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांसह एकूण ३०० कर्मचाºयांनी सोमवारी कामबंद आंदोलन केले. या आंदोलनात घंडागाडी चालक-मालक सहभागी झाल्याने घरातील कचरा संकलित होऊ शकला नाही. खा. उदयनराजे भोसले यांनी संबंधित नगरसेवकावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
सदर बझार परिसरात एक डुक्कर मृत अवस्थेत आढळून आले होते. हे डुक्कर तातडीने न उचलल्याने शनिवारी सकाळी नगरसेवक विशाल जाधव यांनी दिवशी सकटे सदर बझार येथील हजेरी कार्यालयात येऊन दिलीप सकटे यांना दमदाटी व शिवीगाळ केली होती. तसेच बायोमेट्रिक मशीनची तोडफोडही केली होती.
या घटनेच्या निषेधार्थ सफाई कर्मचाºयांनी केलेल्या ठिय्या आंदोलनानंतर पोलिसांनी विशाल जाधव यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. या घटनेला विरोध दर्शविण्यासाठी सोमवारी अखिल महाराष्ट्र कर्मचारी संघाच्या वतीने कामबंद आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार सोमवारी आरोग्य विभागाचे सफाई कर्मचारी व घंटागाडी चालक-मालक यांच्यासह पालिकेतील सुमारे ३०० कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन
केले.
दुपारी खा. उदयनराजे पालिकेत दाखल झाले. यावेळी त्यांनी चुकीच्या गोष्टींना अजिबात थारा देणार नाही, असे सांगून पुरावा मिळाल्यास विशाल जाधव यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यानंतर कर्मचाºयांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, मुख्याधिकारी शंकर गोरे, सभापती मनोज शेंडे, यशोधन नारकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सुमारे दहा टन
कचरा घरीच पडून
पालिकेच्या वतीने शहरातून दररोज सुमारे ७० टन कचरा गोळा केला जातो. या आंदोलनात ८० घंटागाडी चालक व कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे कोणत्याही प्रभागात घंटागाडी फिरकली नाही. त्यामुळे दररोज घरातून संकलित होणारा सुमारे १० टन कचरा गोळा झाला नाही.

Web Title: After the mediation of Udayanrajanj, the movement back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.