तब्बल तीन वर्षांनंतर भरले नांदवळ धरण, बळीराजा सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 02:55 PM2019-08-16T14:55:06+5:302019-08-16T14:56:12+5:30

पिंपोडे बुद्रुक : नांदवळ, ता. कोरेगाव येथील धरण तीन वर्षांनी भरले असून, दुष्काळी उत्तर कोरेगावकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

After three years, Nandaval Dam, Bali Raja was relieved | तब्बल तीन वर्षांनंतर भरले नांदवळ धरण, बळीराजा सुखावला

तब्बल तीन वर्षांनंतर भरले नांदवळ धरण, बळीराजा सुखावला

Next
ठळक मुद्देतब्बल तीन वर्षांनंतर भरले नांदवळ धरण, बळीराजा सुखावला नांदवळ, सोळशी, नायगाव, सोनके, पिंपोडे बुद्रुक गावच्या पाण्याचा प्रश्न निकाली



पिंपोडे बुद्रुक : नांदवळ, ता. कोरेगाव येथील धरण तीन वर्षांनी भरले असून, दुष्काळी उत्तर कोरेगावकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. या धरणातून परिसरातील नांदवळ, सोनके, पिंपोडे बुदु्रक या गावांमधील रब्बी हंगामातील पिकांना पाणी मिळते. धरण भरले असल्याने येथील बळीराजा सुखावला आहे.
नांदवळसह सोळशी, नायगाव, सोनके, पिंपोडे बुद्रुक गावांतील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. सलग दोन वर्षे अपुऱ्या पावसामुळे धरण कोरडे पडल्याने पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न पडले होते. त्यामुळे पाण्याचा विषय गंभीर बनला होता. उत्तर कोरेगाव तालुक्यातील सर्वच गावांना जुलैपर्यंत टँॅकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. मे महिन्यात वसना उपसा जलसिंचन योजनेचे पाणी धरणात सोडण्यात आले होते. मात्र, पाण्याचा विसर्ग अतिशय कमी असल्याने पाणीसाठा होण्यात अडचणी निर्माण होत होत्या.
नांदवळ धरण १९७२ मध्ये बांधण्यात आले आहे. त्याची खोली ७.२० मीटर इतकी असून, पाणी साठवण क्षमता ६३.२१ दशलक्ष घनफूट आहे. एक महिनाभर पडलेल्या संततधार पावसाने गेल्या आठवड्यात धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, सांडव्यातून पाण्याचा विसर्ग वसना नदी पात्रात होत आहे, त्यामुळे आधीच भरून वाहणाºया वसना नदीत अतिरिक्त पाणी येत असून, यावर्षी नदी जास्त काळ प्रवाहित राहण्याची शक्यता आहे.
त्यामुळे उत्तर कोरेगावकर समाधान व्यक्त करत आहेत. दरम्यान, पंचायत समितीचे उपसभापती संजय साळुंखे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सतीश धुमाळ, अशोकराव लेंभे, वीरसेन पवार, नैनेश कांबळे, मंगल गायकवाड, सिंचन निरीक्षक ए. के. वाल्मिकी, सुधाकर पवार यांनी धरणाच्या पाण्याचे जलपूजन केले.

चौकट..
उत्तर कोरेगावच्या सर्वच गावांमध्ये गत तीन वर्षांपासून भरीव कामे झाली आहेत. यंदा चांगला मोसमी पावसामुळे वसना नदी, नांदवळ धरण, बंधारे, ओढे, नाले तसेच फाउंडेशनद्वारे झालेल्या कामांमध्ये चांगला पाणीसाठा झाला आहे. पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असले तरी भूजल पातळी वाढली असून, कोरड्या पडलेल्या विहिरी व बोअरवेल पुन्हा पुनरुज्जीवित झाल्या आहेत.

Web Title: After three years, Nandaval Dam, Bali Raja was relieved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.