पुन्हा लॉकडाऊनच्या भीतीने शेतकरी धास्तावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:21 AM2021-03-30T04:21:53+5:302021-03-30T04:21:53+5:30
प्रत्येक दिवसागणिक कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. यावर उपाय म्हणून प्रशासनाकडून बरेच निर्बंध घातले जात ...
प्रत्येक दिवसागणिक कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. यावर उपाय म्हणून प्रशासनाकडून बरेच निर्बंध घातले जात आहेत. तरीही, लोकांकडून त्याचे अनुपालन केले जात नसल्याने प्रशासनाकडून लॉकडाऊन जाहीर केले जाण्याची संभाव्यता व्यक्त होत आहे. लॉकडाऊन लागू झाल्यास त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतो. लॉकडाऊनमुळे वाहतूकबंदी, बाजारपेठा बंद, संचारबंदी इत्यादींमुळे शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतीमाल शेतात कुजून गेल्याचे चित्र गतवेळी अनुभवल्यामुळे पुन्हा लॉकडाऊन झाल्यास शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांनी लॉकडाऊनची भीती न बाळगता शेतीकामाचे नियमित नियोजन करावे. तथापि, संभाव्य स्थितीत शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक बाळासाहेब सोळसकर, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मंगेश धुमाळ, कोरेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन भागवतराव घाडगे यांनी दिली आहे.