पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही; मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग हाच पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:39 AM2021-02-24T04:39:49+5:302021-02-24T04:39:49+5:30

सातारा : कोरोना महामारी वाढते म्हणून लॉकडाऊन करणे, हा एकमेव पर्याय नाही. शासनाने उद्योजकतेची चाके बंद ठेवली तर अनेक ...

Again lockdown is not affordable; Masks and social distance are the only options | पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही; मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग हाच पर्याय

पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही; मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग हाच पर्याय

Next

सातारा : कोरोना महामारी वाढते म्हणून लॉकडाऊन करणे, हा एकमेव पर्याय नाही. शासनाने उद्योजकतेची चाके बंद ठेवली तर अनेक अडचणी वाढतील. उद्योजकांपुढे आर्थिक संकट उभे राहील, त्यासोबतच जे लोक या उद्योग, व्यवसायावर अवलंबून आहेत, त्यांची उपासमार होईल. त्यामुळे अन्य पर्याय निवडावा, अशी मागणी जिल्ह्यातील उद्योजक करत आहेत.

संपूर्ण राज्यासोबत सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली असल्याने शासन लॉकडाऊनच्या तयारीत आहे. संपूर्ण महाराष्ट्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबोधित करताना आठ दिवसांचा अल्टिमेटम दिलेला आहे. आता पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार, या भीतीमुळे लोकांच्या पोटात गोळा आलेला आहे. बँकांनी त्यांच्या पाठीमागे कर्ज वसुलीचा तगादा लावलेला आहे. बँकांची पुन्हा एकदा वसुली सुरू केली आहे. उद्योग बंद झाले तर अनेक अडचणी निर्माण होतील. शासनाने निर्णय घ्यावा, अशी त्यांची मागणी आहे. यासाठी प्रयत्न करतील, अशी ग्वाहीदेखील दिली जात आहे.

1) कोरोनाचे एकूण रुग्ण- ५८०३१

बरे झालेले रुग्ण -५५२७४

कोरोना बळी - १८४८

धोका वाढतोय ( बॉक्स)

जिल्ह्यामध्ये कोरोना महामारी गायब झाल्याची लोकांमध्ये भावना तयार झाल्याने कोरोना पुन्हा वाढला. लोकांनी मास्क सॅनिटायझर याचा वापर करणे टाळल्याने धोका अधिक वाढलेला आहे. रोज ५०पेक्षा अधिक कोरोनाबाधित आढळत आहेत.

कोट १

कोरोना महामारीमुळे जिल्ह्यातील छोटे उद्योजक अडचणीत सापडले आहेत. या उद्योजकांच्या पाठीमागे बँकांचा कर्ज वसुलीसाठी ससेमिरा सुरू झालेला आहे. लॉकडाऊन केल्यास उद्योजकांसमोर अडचणी वाढतील. लोकांनी आपली तसेच दुसऱ्याचीदेखील काळजी घेऊन नियम पाळल्यास कोरोना महामारी थांबू शकेल.

- बाळासाहेब महामुलकर, उद्योजक

कोट २

जिल्ह्यातील उद्योजकांनी सर्व प्रकारच्या उपाययोजना केलेल्या आहेत. इथून पुढच्या कालावधीतदेखील आम्ही काळजी घेऊ, परंतु शासनाने कुठल्याही परिस्थितीत उद्योग बंद ठेवू नयेत. उद्योग बंद झाले तर अनेक लोकांवर उपासमारीची वेळ येऊ शकते, याची काळजी घेणेही आवश्यक आहे.

- श्रीकांत तोडकर, उद्योजक

कोट ३

जिल्हाधिकाऱ्यांनी रात्रीच्या वेळी संचारबंदी केली असल्याने आता रात्रीच्या शिफ्ट बंद कराव्या लागणार, अशी शक्यता आहे. मात्र, उद्योग सुरू ठेवण्यासाठी कामगारवर्ग कंपन्यांमध्ये येणे आवश्यक आहे. त्यामुळे मासच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांकडे रात्रीच्या वेळी कंपन्यांचे काम सुरू ठेवण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात येणार आहे.

- उदयसिंह देशमुख, अध्यक्ष मास

Web Title: Again lockdown is not affordable; Masks and social distance are the only options

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.