सोशल मीडिया कारवाई विरोधात प्रत्येक जिल्'ाला एक वकील , शिवसेनेची दुटप्पी भूमिका हाच मोठा विनोद : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 10:49 PM2017-11-24T22:49:12+5:302017-11-24T22:54:32+5:30

कºहाड : ‘ज्या सोशल मीडियाच्या आधारावर भाजप सरकार सत्तेत आले त्याच सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल व्यक्त होणाºया भावनांविरोधात कारवाई केली आहे.

Against social media action, every district has an advocate, Sister-in-law of Sister-in-law, Vinod: Sharad Pawar | सोशल मीडिया कारवाई विरोधात प्रत्येक जिल्'ाला एक वकील , शिवसेनेची दुटप्पी भूमिका हाच मोठा विनोद : शरद पवार

सोशल मीडिया कारवाई विरोधात प्रत्येक जिल्'ाला एक वकील , शिवसेनेची दुटप्पी भूमिका हाच मोठा विनोद : शरद पवार

Next
ठळक मुद्दे‘नारायण राणे यांच्याविरोधात सर्वपक्षीय अराजकीय उमेदवार सत्तेतही राहायचे आणि बाहेरून शिवीगाळही करायची हा दुटप्पीपणा लोकांच्या आता लक्षात येऊ लागलासरकार विरोधातील हल्लाबोल आंदोलनाला सुरुवात करत आहोतयवतमाळ ते नागपूर असा मोर्चा

सोशल मीडिया कारवाई विरोधात प्रत्येक जिल्'ाला एक वकील , शिवसेनेची दुटप्पी भूमिका हाच मोठा विनोद : शरद पवार

कºहाड : ‘ज्या सोशल मीडियाच्या आधारावर भाजप सरकार सत्तेत आले त्याच सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल व्यक्त होणाºया भावनांविरोधात कारवाई केली आहे. ज्या युवक, पत्रकारांवर कारवाया होतील, त्यांच्या बाजूने कायदेशीररीत्या पक्ष ठामपणे उभा राहील. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही शुक्रवारी चाळीस वकिलांची बैठक घेतली आहे. प्रत्येक जिल्'ाला एक वकील देऊन सोशल मीडियावरून होणाºया कारवाईबाबत ते संबंधितांची बाजू मांडतील,’ अशी माहिती राष्टÑवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
आधुनिक महाराष्टÑाचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळास अभिवादन करण्यासाठी शरद पवार शुक्रवारी सायंकाळी कºहाडात दाखल झाले.त्यावेळी होते.
शरद पवार म्हणाले, ‘नारायण राणे यांच्याविरोधात सर्वपक्षीय अराजकीय उमेदवार देऊन राष्टÑवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना यांनी त्याला पाठिंबा द्यावा, असा प्रस्ताव इतरांकडून आला आहे. त्यावर आपण योग्य निर्णय घेऊ, शिवसेना एकीकडून भाजपवर टीका करत आहे. आणि दुसºया बाजूने त्यांच्यासोबत सत्तेत आहे. हाच मोठा विनोद आहे. भाजप फसवे आहे, असे शिवसेना म्हणत असेल तर त्या फसव्यांबरोबर तुम्ही जाता कसे? हा आमचा प्रश्न आहे. सत्तेतही राहायचे आणि बाहेरून शिवीगाळही करायची हा दुटप्पीपणा लोकांच्या आता लक्षात येऊ लागला आहे.

राज्यातील साखर कारखान्यांसमोर विजेचा प्रश्न मोठा आहे. त्या अनुषंगाने १८ साखर कारखान्यांच्या अध्यक्षांची बैठक मी घेतली होती. केंद्र व राज्य सरकार म्हणते वीज निर्मिती करा. मात्र प्रत्यक्षात तयार झालेली वीज कोणी घेत नाही. हा एक मोठा किचकट प्रश्न कारखान्यांसमोर आहे. तो सोडविण्याच्या अनुषंगाने साखर संघ व कारखान्यांचे अध्यक्ष यांची बैठक घेतली होती. त्यात काही निर्णय घेतले. त्या अनुषंगाने ते सरकारपर्यंत पोहोचवायचे आहेत.

ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करून सरकार विरोधातील हल्लाबोल आंदोलनाला सुरुवात करत आहोत. त्याची व्याप्ती राज्यभर असणार आहे. विदर्भ, मराठवाडा येथे या आंदोलनाची गरज आहे. त्यानुसार १२ डिसेंबरला मी प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी होणार आहे. यवतमाळ ते नागपूर असा मोर्चा काढण्यात येईल. काँग्रेसच्या प्रत्येकाची इच्छा राहुल गांधी अध्यक्ष व्हावेत अशीच आहे. नव्या पिढीचा उमदा अध्यक्ष होत असेल तर त्यांचे स्वागत व्हायला पाहिजे. नव्या पिढीकडे सूत्रे दिल्यानंतर काय होईल, याचाही अंदाज काँग्रेसला येईल आपणही पाहू,’ असे शरद पवार म्हणाले.

पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौºयाची माहिती पत्रकारांकडून घेतली. मुख्यमंत्री वाळवा येथील हुतात्मा सहकारी साखर कारखान्यावर कार्यक्रमासाठी जाणार असल्याचे समजताच ‘दिवंगत नागनाथअण्णा नायकवडी यांच्या आत्म्याला काय वाटेल देव जाणे. आयुष्यभर अण्णांनी कोणते विचार जोपासले आणि हे लोक काय करायला लागलेत कोणास ठाऊक,’ असे शरद पवार म्हणाले.

 

Web Title: Against social media action, every district has an advocate, Sister-in-law of Sister-in-law, Vinod: Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.