शिरवडेत कृषी जागरूकता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:23 AM2021-07-24T04:23:07+5:302021-07-24T04:23:07+5:30

कोपर्डे हवेली : शिरवडे, ता. कऱ्हाड येथे डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर यांच्या वतीने कृषी जागरूकता अभियानाला ...

Agricultural Awareness Campaign in Shirwad | शिरवडेत कृषी जागरूकता अभियान

शिरवडेत कृषी जागरूकता अभियान

Next

कोपर्डे हवेली : शिरवडे, ता. कऱ्हाड येथे डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर यांच्या वतीने कृषी जागरूकता अभियानाला सुरुवात करण्यात आली. तळसंदे, कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयाचा कृषिदूत सौरभ शिंदे याने येथील शेतकरी जयवंत शिंदे यांच्या शेतास भेट दिली. यावेळी कृषी औद्योगिक कार्यक्रमाची माहिती शेतकऱ्यांना दिली, तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाच्या तज्ज्ञ मार्गदर्शकांनी संगणकावर प्रशिक्षण दिले.

यावेळी प्रा. डी. एन. शेलार, जी. वाय. पाटील, डॉ. के. एस. शिंदे, डॉ. एस. एम. घोलप, प्रा. एस. आर. सूर्यवंशी, प्रा. आर. आर. पाटील आदींनी मार्गदर्शन केले. या अभियानांतर्गत शेतीतील माती परीक्षण, बदलती पीक पद्धती, सेंद्रिय शेती, आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान, बी-बियाणे, औषध फवारणी इत्यादी माहिती देण्यात आली. कार्यक्रमास सरपंच अनिल जगदाळे, कऱ्हाड पंचायत समितीचे माजी उपसभापती सुहास बोराटे, पोलीस पाटील ताजुद्दीन संदे, ग्रामपंचायत सदस्य अंकुश मार्कळ उपस्थित होते.

Web Title: Agricultural Awareness Campaign in Shirwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.