कृषी प्रदर्शनातून आधुनिक शेतीचा जागर !

By admin | Published: January 1, 2017 10:44 PM2017-01-01T22:44:59+5:302017-01-01T22:44:59+5:30

पुसेगावात शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : ‘जलयुक्त’चा देखावा, ठिबक सिंचन, मातीविना शेती प्रयोग ठरला आकर्षण

Agricultural expo to modern farming Jagar! | कृषी प्रदर्शनातून आधुनिक शेतीचा जागर !

कृषी प्रदर्शनातून आधुनिक शेतीचा जागर !

Next

पुसेगाव : येथील श्री सेवागिरी महाराजांच्या ६९ व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय सेवागिरी कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. खटाव सारख्या दुष्काळी भागात कोणताही मोठा उद्योग अथवा कारखाना, बागायती शेती नसताना देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव व त्यांच्या विश्वस्त मंडळाने मठाधिपती सुंदरगिरी महाराज व विश्वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय सेवागिरी कृषी प्रदर्शनाचे आयोजन करून लाखोे शेतकरी व यात्रेकरूंचा आत्मविश्वास वाढविला.
या प्रदर्शनात २५० हून अधिक स्टॉल, आधुनिक तंत्रज्ञानाचा व शेतीसाठीच्या नवनवीन अवजारांचा खजिना, प्रगतशील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतीमाल, आकर्षक फुलझाडे-फळे महिलांसाठी विविध गृहोपयोगी वस्तू पाहायला
मिळाल्या. यात्रेकरूंसह पश्चिम महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना या प्रदर्शनात आधुनिकतेचा बाज पाहायला मिळाला. राज्याच्या विविध भागांतून आलेले प्रदर्शनातील विविध स्टॉलची पाहणी करण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. तीन दिवसांचे हे प्रदर्शन लाखो शेतकऱ्यांच्या भेटीमुळे यशस्वी तर झालेच; पण शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान त्यांच्या बांधापर्यंत नेण्यास उपयुक्त ठरले. तिन्ही दिवसांत प्रदर्शनाला मोठी गर्दी उसळली. या गर्दीमुळे स्टॉलधारकही चांगलेच सुखावले. या प्रदर्शनाची वाढत चाललेली व्याप्ती आणि मिळणारा प्रतिसाद पाहून स्टॉलधारकांनी असे प्रदर्शन निरंतर सुरू ठेवावे, अशी इच्छा व्यक्त केली.
कृषी प्रदर्शनात वेगळी वाट चोखाळणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना चालना देण्याच्या उद्देशाने देवस्थान ट्रस्टच्या वतीने जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा जाहीर सत्कार
करून त्यांना श्री सेवागिरी शेतीनिष्ठ कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित
केले.
या प्रदर्शनात जलसिंचनाचे महत्त्व या भागातील लोकांना समजावे म्हणून श्री सेवागिरी इरिगेटर्सच्या वतीने शेखर क्षीरसागर यांचा नेटा फेम ठिबक सिंचनचा स्टॉल, कृषी अवजारे बायोगॅस, विविध कंपन्यांचे ट्रॅक्टर व अवजारे ठिबक व तुषार सिंचनाचे संच, मातीविना शेती असे नावीन्यपूर्ण स्टॉल शेतकऱ्यांसाठी पर्वणी ठरले.
तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकमार्फत उभारलेल्या स्टॉलमधून ग्राहकांना, शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती, रसायनमुक्त शेतीची संकल्पना, भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात तयार केलेले प्रदर्शनीय उत्पादन, विविध प्रकारच्या जैविक खतांची माहिती दिली जात होती. जिल्हा परिषदेच्या कृषी व जलसंधारण विभागामार्फत उभारण्यात आलेला जलयुक्त शिवार अभियानाचा देखावा वजा स्टॉल तसेच शासकीय योजनांची माहितीचे फलकांनी शेतकऱ्यांना आकर्षित केले.
मोजक्या कालावधीत प्रदर्शनाचे नेटके नियोजन करून प्रदर्शन यशस्वीपणे पाडण्यात देवस्थान ट्रस्ट, पुसेगाव ग्रामस्थांचे व ‘स्मार्ट एक्स्पो’चे संचालक सोमनाथ शेटे यांचे अनमोल सहकार्य लाभले. (वार्ताहर)

Web Title: Agricultural expo to modern farming Jagar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.