विठ्ठलवाडीत शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:39 AM2021-09-19T04:39:19+5:302021-09-19T04:39:19+5:30

ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषी औद्योगिक जोड सन २०२१-२२ दरम्यान घेण्यात आलेल्या या विविध कार्यक्रमादरम्यान कृषिदूतांनी गावचे ज्येष्ठ ...

Agricultural guidance to farmers in Vitthalwadi | विठ्ठलवाडीत शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शन

विठ्ठलवाडीत शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शन

Next

ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषी औद्योगिक जोड सन २०२१-२२ दरम्यान घेण्यात आलेल्या या विविध कार्यक्रमादरम्यान कृषिदूतांनी गावचे ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ यांच्यासोबत कृषी क्षेत्रातील अडचणी व त्यातील संधी या विषयावर चर्चा केली.

या कार्यक्रमांतर्गत गावातील शेतातील माती परीक्षण, फळबाग लागवड, सेंद्रिय शेती, बीजप्रक्रिया, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, शेतीचे आर्थिक नियोजन, जनावरांचे लसीकरण इत्यादी विषयांची प्रात्यक्षिके आयोजित करून, आधुनिक तंत्रज्ञानाविषयी जनजागृती करण्यात आली.

कृषी महाविद्यालयाचे प्रा.डॉ.एस.डी. निंबाळकर, कार्यक्रम प्रमुख प्रा.एन.एस. ढालपे , प्रा.ए.एस. नगरे, डॉ.व्ही.पी. गायकवाड, प्रा.एस.वाय. लाळगे आदींचे मार्गदर्शन लाभले. यावेळी सरपंच शीतल कोरडे, उपसरपंच भरत बोडके, शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Agricultural guidance to farmers in Vitthalwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.