कृषी अधिकाऱ्यांना मारहाणप्रकरणी काळ्या फिती लावून काम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 02:00 PM2018-08-31T14:00:10+5:302018-08-31T14:01:11+5:30
पाटण तालुका कृषी अधिकारी प्रवीण आवटे यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी काळ्या फिती लावून निषेध नोंदविला.
सातारा : पाटण तालुका कृषी अधिकारी प्रवीण आवटे यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी काळ्या फिती लावून निषेध नोंदविला. पाटण येथे कृषी विभागामार्फत झालेल्या शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी प्रवीण आवटे या कृषी अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली होती. तालुक्यात जास्त पाऊस झाला असल्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करूनदेखील कोणतीच कारवाई झाली नसल्याबाबत पाटणकर यांनी तालुका कृषी अधिका-यांना जाब विचारला होता.
तेव्हा दोघांमध्ये शाब्दिक हमरीतुमरी झाल्यानंतर पाटणकरांनी आवटे यांच्या कानशिलात लगावली होती. या घटनेच्या निषेधार्थ जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील कर्मचा-यांनी शुक्रवारी काळ्या फिती लावून काम केले. तालुका कृषी अधिकारी कार्यालयांमध्ये याप्रकारे घटनेचा निषेध करण्यात आला. जिल्ह्यातील ७५० कृषी कर्मचा-यांनी हा निषेध केला.