सहा गावच्या शेतीला टेंभूचे पाणी मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:37 AM2021-05-17T04:37:08+5:302021-05-17T04:37:08+5:30
माण तालुक्यातील कोरेवाडीत आलेल्या टेंभूच्या पाण्याचे पूजन अनिल देसाई यांच्या हस्ते झाले, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती ...
माण तालुक्यातील कोरेवाडीत आलेल्या टेंभूच्या पाण्याचे पूजन अनिल देसाई यांच्या हस्ते झाले, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सदस्य तानाजी काटकर, बापूराव नलवडे, विरळीचे सरपंच प्रशांत गोरड, बनगरवाडीचे माजी सरपंच भारत अनुसे, बापूराव बनगर, तानाजी बनगर, साहेबराव खरात, शहाजी ढेरे, बाबाराजे हुलगे, अनिकेत आटपाडकर, भागवत पिसे, प्रल्हाद अनुसे, गणेश माने, हर्षद माने, किसन घुटुगडे, राजू गोरड, विष्णू जमाले उपस्थित होते.
देसाई म्हणाले, ‘नेतृत्वाची द्यायची दानत असेल तर पाणी मिळतंच याचे हे उत्तम उदाहरण आहे. हे श्रेय माझ्या एकट्याचे नसून, आपण सर्वांनी मला साथ दिल्यामुळेच आपणाला हे पाणी मिळाले आहे. पाण्याची योजना आपल्याला कायमस्वरूपी सुरू ठेवायची आहे. त्यासाठी सर्वांच्या ऐकीची साथ महत्त्वाची आहे. मी जोपर्यंत राजकारणात सक्रिय आहे, तोपर्यंत कधीच ही योजना बंद पडू देणार नाही. आपला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असला तरी शेतीसाठी जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत स्वस्थ बसायचे नाही.’
यावेळी भारत अनुसे, बापूराव बनगर यांनी मनोगत व्यक्त केले.
१६वरकुटे-मलवडी
कोरेवाडीत टेंभूच्या पाण्याचे पूजन अनिल देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी तानाजी काटकर, भारत अनुसे, बापूराव बनगर, बाबाराजे हुलगे उपस्थित होते.