विजेच्या लपंडावामुळे शेती अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:24 AM2021-07-12T04:24:31+5:302021-07-12T04:24:31+5:30

शामगाव : शामगाव परिसरातील शेतकरी पाऊस नसल्याने खरीप हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी धडपड करत असताना दिवसांतून अनेक ...

Agriculture in trouble due to power outage | विजेच्या लपंडावामुळे शेती अडचणीत

विजेच्या लपंडावामुळे शेती अडचणीत

Next

शामगाव : शामगाव परिसरातील शेतकरी पाऊस नसल्याने खरीप हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी धडपड करत असताना दिवसांतून अनेक वेळा वीज जात असते तर काहीवेळा संपूर्ण दिवस वीज येतच नाही. वीज वितरण कंपनीच्या अंदागोंदी कारभारामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.

शामगाव परिसरात सध्या खरीप हंगामातील पिकांना पावसाने ओढ दिल्याने शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी धडपडत असतात. अनेकवेळा वीज जाते. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत असते. वीज कधी येणार याविषयी वायरमन यांना फोन केला तर उचलला जात नाही. त्यामुळे इतर काम सोडून विजेची वाट पाहावी लागते. रिसवड, अंतवडी, शामगाव या गावांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने अगोदरच तोट्यात आला असतानाच वीज वितरण कंपनीच्या या गलथान कारभारामुळे त्यामध्ये जास्तच भर पडत आहे. वीज वितरण कंपनीने सातत्य राखून वीज द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

चौकट..

शेतीपंपासाठी आठवड्यातील चार दिवस असते. त्यामध्ये अनेकवेळा वीज जाते. काहीवेळेस तर संपूर्ण दिवस वीज नसते. वीज कधी येईल यासंदर्भात वायरमन यांना विचारण्यासाठी फोन केला असतात फोन उचलला जात नाही. त्यामुळे विजेची वाट पाहत इतर कामधंदे सोडून वाट पाहावी लागते.

Web Title: Agriculture in trouble due to power outage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.