अहमदनगर पोलीस संघ ठरला अव्वल
By admin | Published: December 19, 2014 09:13 PM2014-12-19T21:13:57+5:302014-12-19T23:35:06+5:30
कबड्डी स्पर्धा : सेवागिरी चषकाचा मिळलिला मान
पुसेगाव : श्री सेवागिरी महाराजांच्या ६७ व्या यात्रेनिमित्त झालेल्या ‘श्री सेवागिरी चषक’ जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेतील अंतिम सामन्यात अहमदनगर पोलीस संघाने अहमदनगरच्या ‘रणवीर भेंडा’ कबड्डी संघाचा पराभव करून २५ हजारांच्या बक्षिसासह ‘सेवागिरी चषक’ पटकाविला. या स्पर्धेत राज्यातील नामवंत ३३ संघांनी सहभाग घेतला होता.
येथील श्री हनुमानगिरी हायस्कूलच्या मैदानावर या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. शुक्रवारी पहाटे चार वाजेपर्यंत या स्पर्धा सुरू होत्या. नगरच्या रणवीर भेंडा संघाला द्वितीय क्रमांकाचे १५ हजारांचे, वायफळे येथील खंडेराया कबड्डी संघाला तृतीय क्रमांकाचे दहा हजारांचे तर येडेमच्छिंद्र क्रांतिसिंह शिवनगर कबड्डी संघाला चतुर्थ क्रमाकांचे पाच हजारांचे मिळाले.
तसेच विजय पाटील (वायफळे) उत्कृष्ट चढाई, रूपेश शेवते (भुर्इंज) उत्कृष्ट पकड, अधिक घाडगे (येडेमच्छिंद्र) उत्कृष्ट उजवा मध्यरक्षक, किरण मोरकर (अहमदनगर) उत्कृष्ट डावा मध्यरक्षक, गणेश कांबळे (सातारा) उत्कृष्ट उजवा कोपरा, सागर आगळे (अहमदनगर) उत्कृष्ट डावा कोपरा यांना प्रत्येकी एक हजाराची बक्षिसे देण्यात आली.
अरण मदने, संजय जाधव, सुनील मदने, रमेश सोनावणे, रेवण पाटील, सुनील खरात, सागर घोरपडे, शाम देवकर, ईशांत वाघमारे, बबलू कांबळे, किरण मदने, सूरज जाधव, विकास शिंदे, सुशांत कांबळे, विशाल वाघमारे व जिल्हा कबड्डी असोसिएशन यांनी स्पर्धेचे नियोजन केले. डी. पी. ननावरे, सुनील खरात, उमेश साबळे, शशिकांत यादव, देशमुख यांनी पंच म्हणून काम पाहिले.
रात्री चार वाजता अंतिम सामना संपल्यानंतर विजेत्या संघांना बक्षिसे देण्यात आली. दरम्यान, गुरुवारी दि. १८ सकाळी ११ वाजता आशियाई सुवर्ण पदक विजेत्या भारतीय कबड्डी संघाचा खेळाडू नितीन मदने, श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव, डॉ. प्र.ल. भुजबळ, विजय जाधव, शिवाजीराव जाधव, अॅड. विजयराव जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. (वार्ताहर)
महेश पवारला ‘मॅन आॅफ दी मॅच
वैयक्तिक बक्षीस अंतर्गत अंतिम सामन्यातील वसीम इनामदार (अहमदनगर) यास ‘मॅन आॅफ द मॅच’चे तर महेश पवार (शिवनगर) यास ’अष्टपैलू’ खेळाडूचे प्रत्येकी एक हजार पाचशे रुपयांचे बक्षीस मिळाले.