तीस हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:24 AM2021-07-19T04:24:27+5:302021-07-19T04:24:27+5:30
गाव पातळीवर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड व्हावी. गावे हरीत व्हावीत, यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ.आबासाहेब पवार यांचे सातत्याने प्रयत्न ...
गाव पातळीवर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड व्हावी. गावे हरीत व्हावीत, यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ.आबासाहेब पवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरू असतात. सुपने, किरपे, भोळेवाडी, गमेवाडी, घारेवाडी, पोतले, वडोली निळेश्वर, वराडे, गोंदी, कासारशिरंबे, किवळ, साकुर्डी, बनवडी, डिचोली, बाबरमाची, हजारमाची या ठिकाणी गावठाण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमांतर्गत तीस हजार रोपे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या बचत गटांना वृक्षलागवडीबरोबर पुढील तीन वर्षे लावलेल्या रोपांचे संगोपन करण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. या बदल्यात महिलांना ठरावीक रक्कम मिळणार आहे. तीन वर्षांत जवळपास साडेचार कोटी रुपये बचत गटातील महिलांना रोजगार मिळेल, अशी माहिती गटविकास अधिकारी डॉ.आबासाहेब पवार यांनी दिली.
- कोट
पर्यावरणाचा ऱ्हास लक्षात घेता, गाव पातळीवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण गरजेचे आहे. यासाठी पंचायत समितीमार्फत प्रयत्न सुरू आहेत. गावागावात वृक्षारोपणाची चळवळ वाढीस लागावी.
- डॉ.आबासाहेब पवार, गटविकास अधिकारी
फोटो : १८केआरडी०२
कॅप्शन : कऱ्हाड पंचायत समितीमार्फत गावोगावी वृक्षारोपण मोहीम हाती घेण्यात आली आहे.