दरोडा टाकण्यासाठी विमानाने प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 10:24 PM2017-09-07T22:24:46+5:302017-09-07T22:26:08+5:30
कºहाड (जि. सातारा) : पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाºया टोळीला कºहाड पोलिसांनी चतुर्भुज केल्यानंतर तपासात या टोळीचे अनेक कारनामे समोर येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
कºहाड (जि. सातारा) : पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाºया टोळीला कºहाड पोलिसांनी चतुर्भुज केल्यानंतर तपासात या टोळीचे अनेक कारनामे समोर येत आहेत. दरोडा टाकण्यापूर्वी ही टोळी दोनवेळा दिल्लीतून चक्क विमानाने थेट पुण्यात आणि तेथून कºहाडात आली होती. तसेच या टोळीने आजपर्यंत देशभरात रेकी करून अनेक ठिकाणी दरोडे टाकल्याचे स्पष्ट झाले आहे.
अक्षय भारत कावरे (रा. अपशिंगे, ता. कडेगाव, जि. सांगली), अनमोल जीवनसिंग शर्मा (रा. हसी, हरियाणा), दीपक रामराज गर्ग (रा. पैकरहेडी, हरियाणा), ईश्वरसैनी राजकुमारसैनी (रा. पिहोवा, हरियाणा) व महेंद्र सुर्यग्यान गुजर (रा. बाबुधाम, नवी दिल्ली) अशी अटकेत असलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत.
कºहाड तालुक्यातील वडगाव हवेली येथे १२ आॅगस्टला रात्री दत्तकृपा पेट्रोल पंपावर दरोडा पडला होता. पोलिसांनी दरोडेखोरांच्या टोळीला शिताफीने पकडले होते. तपासा-दरम्यान दरोडेखोरांचे दिल्लीपर्यंतची ‘कनेक्शन’ पोलिसांच्या समोर आले. दिल्लीतील एका गँगस्टरसोबतची छायाचित्रेही पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता टोळीचे अनेक कारनामे समोर आले. कºहाडनजीक वडगाव हवेली येथे दरोडा टाकण्यापूर्वी या टोळीने कडेगाव येथे पंपावर दरोडा टाकला होता. त्यापूर्वी दोनवेळा ही टोळी दिल्लीमधून थेट विमानाने पुण्यात व तेथून खासगी वाहनाने कºहाडात आली होती. सातारा व सांगली जिल्ह्यातील काही पंपांची पाहणी करून या टोळीने दरोड्याचा कट रचला होता. पुढे काही दिवसांतच कडेगाव तसेच वडगावच्या पंपावर दरोडा टाकला होता. टोळीने अशाच प्रकारचे गुन्हे मुंबई आणि दिल्ली शहरासह व पंजाब राज्यात केल्याचे स्पष्ट झाले आहे.
म्होरक्या कुटुंबासह पसार
वडगाव हवेली येथील पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाºया टोळीला पोलिसांनी दोन तासांत जेरबंद केले. त्यानंतर पोलिस तपासात या टोळीमध्ये कडेगाव तालुक्यातील अपशिंगेतील एकाचा सहभाग असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी त्यालाही अटक केली. मात्र, आपले साथीदार पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती नेर्ली ( ता. कडेगाव) येथील म्होरक्याला मिळाली. त्यानंतर तो कुटुंबासह पसार झाला.