अजित पवारांचा अविनाश मोहितेंना कानमंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:30 AM2021-06-01T04:30:11+5:302021-06-01T04:30:11+5:30

कऱ्हाड : रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच ...

Ajit Pawar's ear mantra to Avinash Mohite | अजित पवारांचा अविनाश मोहितेंना कानमंत्र

अजित पवारांचा अविनाश मोहितेंना कानमंत्र

Next

कऱ्हाड : रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातारा दौऱ्यावर आले असता, ‘कृष्णे’चे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी त्यांची भेट घेतली. कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात यावेळी सखोल चर्चा झाली असून, गरज लागेल तेथे मी मदत करेन, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोहितेंना दिल्याची चर्चा आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन दिवसांपूर्वी सातारा जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यावेळी अविनाश मोहिते यांनी कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात त्यांची भेट घेऊन चर्चा केली. कृष्णा कारखाना निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलला शह देण्यासाठी विरोधी अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक पॅनल आणि इंद्रजित मोहिते यांच्या नेतृत्वाखालील रयत पॅनलमध्ये समेट घडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर हे काँग्रेसचे नेते आघाडीसाठी प्रयत्नशील असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही एकीने लढा, असे सांगत काँग्रेस नेत्यांच्या सुरात सूर मिसळल्याची चर्चा आहे. तसेच तडजोड न झाल्यास संघर्षाला कमी पडू नका, असा सल्लाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अविनाश मोहिते यांना दिल्याचे समजते. तसेच गरज लागेल तेथे मी मदत करेन, अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी दिल्याची चर्चा आहे.

Web Title: Ajit Pawar's ear mantra to Avinash Mohite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.