'अजितदादांचा वकील माझ्या नवऱ्याचा वर्गमित्र...'; सुप्रीम कोर्टात काय घडलं, सुप्रिया सुळेंनी सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 01:46 PM2023-10-20T13:46:55+5:302023-10-20T13:47:48+5:30
राष्ट्रवादीची सुनावणी काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टात झाली.
सातारा- राष्ट्रवादी काँग्रेसमधील नऊ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचे दिसत आहे, आता या दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगात अर्ज केले आहेत. तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टातही आमदार अपात्रतेवर सुनावणी सुरू आहे. काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टात सुनावणीही झाली. या सुनावणीवेळी खासदार सुप्रिया सुळे या स्वत: उपस्थित होत्या. यावेळी कोर्टात नेमकं काय घडलं याची माहिती सुळे साताऱ्यात एका कार्यक्रमात बोलताना दिली आहे.
कंत्राटी भरतीचा GR रद्द, देवेंद्र फडणवीसांची घोषणा; ठाकरे-पवारांवर गंभीर आरोप
खासदार सुप्रिया सुळे सातारा दौऱ्यावर होत्या, यावेळी त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना सुप्रीम कोर्टात सुनावणीवेळी काय झालं याची माहिती दिली. सुप्रिया सुळे म्हणाल्या, आज अदृष्य शक्तीने शिवसेनेत दोन गट पाडले पण मी दोन गट बोलत नाही, मी आजही उद्धव ठाकरे यांनाच शिवसेना प्रमुख बोलते. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच त्यांनी केलं. आता लढाई सुप्रीम कोर्टात सुरू आहे. मी कधी सुप्रीम कोर्टात गेलेली नाही,या निमित्ताने मला जायला मिळाले. पण तिथे गेल्यावर समोरचा वकील निघाला तो सदानंद सुळे यांचा वर्गमित्र निघाला. त्यांना एवढ्या मोठ्या देशात दुसरा वकील नाही मिळाला. मिळाला तो पण माझ्या नवऱ्याचा वर्गमित्रच निघाला, पण आमचा काही सेटींग नाही. मी त्याला म्हटले तु तुझ्या क्लाईंटच काम कर. कोर्टमध्ये असताना ताकदीने लढू असं मी त्यांना म्हटले, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. यावेळी एकच हशा पिकला.
'आता निवडणूक आयोगात सुनावणी झाली, यावेळी स्वत: शरद पवार साहेब तिथे उपस्थित होते. पण, त्यांच्या बाजूचे एकही जण तिथे उपस्थित नव्हते, असंही सुळे म्हणाल्या. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना सुरू केली, त्यांनी त्यांच्या हयातीतच त्यांनी शिवसेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली सगळे निवडणुका लढले आज अदृष्य शक्तीने काय केले हे तुम्ही सर्वांनी बघितलं आहे, असंही सुळे म्हणाल्या.