‘अक्काबाई’ हद्दपार
By admin | Published: September 7, 2014 10:20 PM2014-09-07T22:20:43+5:302014-09-07T23:22:02+5:30
शिवथर ग्रामसभेत ठराव : अनेकांचे संसार सावरणार
शिवथर : ता. सातारा येथील ग्रामपंचायत ग्रामसभेमध्ये अवैद्य दारु विक्री व्यवसाय बंद करणेबाबत एकमुखी निर्णय झाला.
गावामध्ये देशी दारुचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात तेजीत चालत होता. त्यामुळे बऱ्याच कुटुंबाचे संसार उद्धवस्थ झाले होते. परंतु बऱ्याचदा गावातील पदाधिकाऱ्यांना सांगुन सुद्ध दारु व्यवसाय बंद होत नव्हता. परंतु, ग्रामसभेमध्येच दारु व्यवसायाबाबत एकमुखी निर्णय घेण्यात आला. आणि याची माहिती सातारा तालुका पोलीस स्टेशनला दिल्याने नागरिक व महिलांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिवथर परिसरामध्ये अवैद्य दारु विक्री व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असून त्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागत असून घरातील महिलांना याचा शारिरीक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच गावात नाहक तंटे निर्माण होऊन गावातील शांतता भंग ळोत आहे. दारमुळे बऱ्याच लोकांची कुटूंबे उद्धवस्थ झाली आहेत.
काहींच्या घरामध्ये दिवसभर काबाडकष्ट करुन जो मोबदला मिळत होता. तो घरी न आणता त्याच पैशांची दारु पिणारे लोक यांच्या घरामध्ये बायको आणि मुले अन्नावाचून उपाशीपोटी झोपत आहेत.
गावामध्ये दारु मिळत असल्याने महिलांही त्रस्त झाल्या होत्या. परंतु याबाबत आवाज कोण उठवत नव्हते. याच गोष्टीचा मोठा उद्रेक झाल्याने शेवटी ग्रामसभेमध्ये दारुबंदीचा निर्णय घेण्यात आला. आणि तोच ठराव त्याच दिवशी सातारा तालुका पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याकडून तातडीने अमंलबजावणी होणार का? असाही सवाल महिलाकडून होत आहे. त्यामुळे शिवथरमधून दारू हद्दपार करण्याचा एकमुखी निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. (वार्ताहर)
अवैध दारूविक्री थांबणार का?
तातडीने अवैद्य दारु विक्री बंदीबाबत ठोस निर्णय घेतला जाणार का? आणि तातडीने दारु विक्री बंद न झाल्यास गावातील संपूर्ण महिला एकत्र येऊन आंदोलन करणार असा इशारा माजी सरपंच शकुंतला साबळे यांनी दिला आहे.